अग्निपथ योजना अंतर्गत अग्निवीरांसाठी 10% आरक्षण जाहीर | Agnipath Scheme 2022 Information In Marathi

 

मित्रांनो नुकतीच आपल्या देशातील केंद्र सरकारच्या वतीने संरक्षण विभागातील नोकऱ्यांसाठी अग्निपथ योजना 2022 आणली आहे. आता या Agnipath Yojna मध्ये काही बदल करण्यात आले आहेत. तसेच देशातील जे तरुण या अग्निपथ योजना अंतर्गत अग्णीविर म्हणून देशसेवा करतील अशा तरुणांसाठी नवीन महत्वपूर्ण घोषणा केलेल्या आहेत. त्या मध्ये अग्निपथ योजना अंतर्गत अग्निवीरांसाठी 10% आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. अश्या सर्व नवीन करण्यात आलेल्या बदल विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.AGNIPATH SCHEME 2022

 

 

 

अग्निपथ योजना अंतर्गत अग्निवीरांसाठी 10% आरक्षण जाहीर | Agnipath Scheme 2022 Information In Marathi
अग्निपथ योजना अंतर्गत अग्निवीरांसाठी 10% आरक्षण जाहीर | Agnipath Scheme 2022 Information In Marathi

 

 

 

Agneepath Yojana 2022 अंतर्गत आता आपल्या देशातील अग्निवीरांसाठी संरक्षण विभागातील नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. अशी माहिती आपल्या देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. भारतीय तटरक्षक दल तसेच नागरी संरक्षण दल आणि सार्वजनिक क्षेत्रातील 16 संरक्षण उपक्रमांमधल्या नोकऱ्यांमध्ये आता अग्निपथ योजना अंतर्गत कर्तव्य बजावणाऱ्या अग्निवीरांसाठी  10% आरक्षणाला मान्यता ही केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आलेली आहे. Agneepath Yojana Mahiti Marathi

 

 

हे नक्की वाचा:- अग्निपथ योजना काय आहे? संपूर्ण माहिती

 

 

अग्निविरांसाठी भारतीय तटरक्षक दल, नागरी संरक्षण दलातील पदे आणि सार्वजनिक क्षेत्रातील सर्व 16 संरक्षण क्षेत्रातील पदांमध्ये आता 10% जागा ह्या राखीव ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे अग्नीविर कर्तव्य बजावल्या नंतर म्हणजेच रिटायरमेंट नंतर या क्षेत्रात सहज जॉब मिळवू शकतील. तसेच आता संरक्षण क्षेत्रात सर्व भरत्या अग्निपथ योजना अंतर्गत होणार आहे. त्याच बरोबर आपल्या भारत देशातील अनेक उद्योगपतींनी त्यांच्या कंपन्या मध्ये आग्निविर यांना प्राधान्य देऊ असे म्हटले आहे. Agneepath scheme changes information in marathi

 

 

 

भारत सरकारच्या वतीने अग्णीविर यांना खालील सरकारी क्षेत्रात 10% आरक्षण मंजूर केले आहे. तसेच आता आग्नीविर यांच्या करिता 10% कोटा राखीव ठेवण्यात येणार आहेत.

 

 

1. AAL

2. BEL

3. BEML

4. BDL

5. GRSE

6. GSL

7. HSL

8. MDL

9. MIDHANI

10. AVNL

11.  AW&EIL

12. MIL

13. YIL

14. GIL

15. IOL

16. TCL

 

 

हे नक्की वाचा:- education loan कसे घ्यावे? संपूर्ण माहिती

 

 

Agneepath yojna अंतर्गत वरील सर्व ठिकाणी agneevir यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. अश्या प्रकारे अनेक बदल हे आता आपल्या देशातील अग्निपथ योजना अंतर्गत समाविष्ट होणाऱ्या अग्निवीरांसाठी घेतले आहेत.

 

 

 

हा लेख तुम्हाला कसा वाटला याविषयी अभिप्राय नक्की द्या. तसेच अशाच महत्वपूर्ण माहिती करिता Telegram channel ला जॉईन होऊ शकतात.