ड्रॅगन फ्रुट लागवड अनुदान योजना, लागवड पद्धत, अर्ज प्रक्रिया, अनुदान | what is dragon fruit farming subsidy yojana in maharashtra

 

आजच्या या पोस्ट मध्ये आपण ड्रॅगन फ्रुट लागवड अनुदान योजना विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. ड्रॅगन फ्रुट हे एक अतिशय लाभदायी फळ आहे ड्रॅगन फ्रुट म्हणजे भारतीय कमळ होय. हे एक औषधी गुणधर्म असलेले महत्वपूर्ण असे फळ आहे. आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी अनुदान देण्यात येत आहे. Dragon fruit farming subsidy in maharashtra

 

ड्रॅगन फ्रुट लागवड अनुदान योजना, लागवड पद्धत, अर्ज प्रक्रिया, अनुदान | what is dragon fruit farming subsidy yojana in maharashtra
ड्रॅगन फ्रुट लागवड अनुदान योजना, लागवड पद्धत, अर्ज प्रक्रिया, अनुदान | what is dragon fruit farming subsidy yojana in maharashtra

 

 

 

आपल्या महाराष्ट्र राज्य ड्रॅगन फ्रुट लागवड योजना ही एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत राबविण्यात येत आहे. ड्रॅगन फ्रूट या फळामध्ये असलेले औषधी तसेच पोषक द्रव्ये लक्षात घेता आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने कृषी विभागाद्वारे महाराष्ट्र राज्यात वर्ष 2021 व 2022 मध्ये राष्ट्रीय एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत ड्रॅगन फ्रुट लागवड अनुदान योजना ही राबविण्यात येत आहे. Dragon fruit farmimg subsidy साठी १ लाख ६० हजार अनुदान देण्यात आलेले आहेत.

 

हे नक्की वाचा:- ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र २०२२ अर्ज सुरू

 

ड्रॅगन फ्रूट या फळास सुपर फ्रूट म्हणून प्रसिद्धी ही मिळालेली आहे. कारण या फळामध्ये अनेक उपयोगी पोषक तत्वे ही आहेत. ड्रॅगन फ्रूट या फळामध्ये फॉस्फरस, कॅल्शियम तसेच अनेक प्रकारची औषधी गुणधर्म असल्यामुळे हे ड्रॅगन फ्रुट आपल्यासाठी पोषक आहे. हे ड्रॅगन फ्रूट फळ कमी पाण्यात सुद्धा टिकतात. तसेच ड्रॅगन फ्रुट या फळांच्या झाडावर रोग तसेच किडी जास्त प्रमाणात नुकसान करू शकत नाही. त्यामुळे ड्रॅगन फ्रुट शेती करण्यासाठी लागणारा खर्च हा कमी असतो. आता आपल्या भारतीय बाजारात ड्रॅगन फ्रूट या फळाची मागणी ही दिवसेंदिवस वाढत आहे.

 

 

ड्रॅगन फ्रूट अनुदान योजना :-

जर तुम्हाला तुमच्या शेतात ड्रॅगन फ्रुट लागवड करायची असल्यास महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत ड्रॅगन फ्रुट लागवड करणे, ड्रॅगन फ्रुट ची लागवड करण्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करणे, ठिबक सिंचन तसेच ड्रॅगन फ्रूट साठी लागणारी खते आणि पीक संरक्षण तसेच ड्रॅगन फ्रूट आधार पद्धत साठी अनुदान हे देण्यात येत आहे. ड्रॅगन फ्रूट अनुदान वितरण करताना प्रति हेक्‍टर चार लाख रुपये इतके प्रकल्पमूल्य ग्राह्य धरण्यात येते आणि 40 टक्‍क्‍यांप्रमाणे एक लाख 60 हजार रुपये प्रति हेक्‍टर अनुदान तीन वर्षात 60:20:20 या प्रमाणात अनुदान हे देण्यात येत आहे.

 

हे नक्की वाचा:- महा डी बी टी पोर्टल वर विविध शेतकरी योजनांसाठी अर्ज कसा करायचा

 

परंतु अनुदान मिळविण्यासाठी आपण लागवड केलेल्या ड्रॅगन फ्रूट या फळ पिकांची दुसऱ्या वर्षी 75 टक्के इतकी झाडे व तिसऱ्या वर्षी 90 टक्के इतकी झाडे ही जिवंत असावी लागतेच.

 

 

 

ड्रॅगन फ्रुट फळ पीक लागवडीची पद्धत :-

 

ड्रॅगनफ्रूट फळपिकाची लागवड करण्यासाठी सर्वप्रथम जमिनीची मशागत ही करून घ्यावी लागेल. त्यानंतर ड्रॅगन फ्रुट च्या दोन झाडांतील अंतर हे 3 मीटर बाय 3 मीटर, 3 मीटर बाय 2.5 मीटर या अंतरावर खड्डे खोदणे त्यानंतर खड्ड्याच्या मधोमध सिमेंट कॉंक्रीटचा किमान 6 फूट उंचीचा खांब हा उभा करावा व त्या खांबावर सिमेंट कॉंक्रिटची फ्रेम ही बसवावी. आणि आपण जो सिमेंट काँक्रिट चा खांब लावाल त्या खांबाच्या चारही बाजूला ड्रॅगन फ्रुट फळ पिकाचं एक एक झाड म्हणजेच चार रोपे लावली. अश्या पद्धतीने ड्रॅगन फ्रुट लागवड करायची आहे.

 

हे सुद्धा वाचा;- कांदा चाळ अनुदान योजना काय आहे? 

 

ड्रॅगन फ्रूट अनुदान योजना अर्ज प्रक्रिया :-

 

ड्रॅगन फ्रूट या फळ पिकासाठी अर्ज करायचा असल्यास तुम्हाला महा डी बी टी maha dbt farmers portel वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. महाराष्ट्र शासनाच्या एक शेतकरी अनेक योजना च्या महा डी बी टी पोर्टल वर सर्वात प्रथम नोंदणी करून घ्यावी त्या नंतर युजर आयडी आणि पासवर्ड तयार केल्या नंतर लॉगिन करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.

 

अर्ज करण्याची वेबसाईट साठी इथे क्लिक करा.

 

ड्रॅगन फ्रुट योजना लागवड पद्धत अंदाजपत्रक अर्ज प्रक्रिया माहिती साठी इथे क्लिक करा

 

 

जर तुम्हाला ही माहिती महत्वपूर्ण वाटत असल्यास नक्की शेअर करा.

 

Leave a Comment