maha dbt farmer’s scheme 2022 अंतर्गत शेतकरी बांधवांना कृषी विभागाच्या अनेक योजनांसाठी आपल्या महाराष्ट्र शासनाच्या Maha Dbt Portal वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा सादर करावा लागत असतो. शेतकरी बांधवांना सर्व योजनांचा लाभ हा एकाच छताखाली मिळावा या हेतूने आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने महा डी बी टी पोर्टल वर ऑनलाईन पद्धतीने विविध योजनांसाठी अर्ज हा करायचा असतो.
Maha DBT पोर्टल वर विविध योजनांसाठी अर्ज सुरू | maha dbt farmer’s scheme 2022 |
Mahadbt farmer Scheme 2022 अंतर्गत कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी maha Shivaratri portel वर वर्ष 2022 साठी अर्ज हे सुरू झालेले आहेत. या महा डी बी टी पोर्टल च्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांसाठी अर्ज हे सुरू झालेले आहेत.
शेतकरी योजना अर्ज सुरू महा डी बी टी शेतकरी योजना अंतर्गत शेतकरी योजनांसाठी एकाच पोर्टल वर सर्व अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. या मध्ये अनेक योजनांचा समावेश हा करण्यात आलेला आहे. जसे की कृषी यांत्रिकीकरण योजना ( यामध्ये शेती उपयोगी अवजारे, जसे की ट्रॅक्टर, पॉवर टिलर, कृषी अवजारे यांचा समावेश आहेत. ) राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना, फलोत्पादन विकास अभियान आणि राष्ट्रीय कृषी विकास योजना अश्या अनेक योजना साठी एकाच महा डी बी टी पोर्टल वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहेत.
हे नक्की वाचा:- पाणलोट विकास योजना
महा डीबीटी पोर्टल वर समाविष्ट योजना:-
या Maha Dbt farmer’s portel च्या माध्यमातून तुम्ही ट्रॅक्टर, पॉवर टिलर, पेरणी यंत्र, पाईप संच, तुषार सिंचन, ठिबक सिंचन, वृष लागवड, मधुमक्षिका पालन, कांदा चाळ, ड्रॅगन फ्रूट, शेततळे, शेडनेट हाऊस, रोटाव्हेटर, पंपसंच अश्या अनेक योजना ह्या महा डी बी टी पोर्टल च्या माध्यमातून अर्ज हा करता येणार आहेत.
महा-डीबीटी वर शेतकरी योजनांसाठी अर्ज कसा करायचा ( How to apply for maha dbt farmer’s scheme) :-
१)शेतकरी योजनांच्या विविध योजनेचे अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही https://mahadbtmahait.gov.in/ ह्या संकेतस्थळावर जावे लागेल. त्या नंतर शेतकरी योजना ह्या पर्यायावर क्लिक करावे. त्या नंतर maha dbt farmer’s portel हे ओपन होईल.
हे नक्की वाचा:- पोक्रा योजना काय आहे? कसा करायचा अर्ज
२)त्या नंतर लाभार्थ्यांनी वैयक्तिक लाभार्थी म्हणून रजिस्ट्रेशन करून घ्यावे. आधार कार्ड नंबर टाकून नोंदणी करून घ्यावी.
३)स्वतःची संपूर्ण प्रोफाइल ही भरून घ्यावी. त्यानंतर त्यांची जमीन ची माहिती. सिंचन सोय इत्यादी माहिती ही भरून घ्यावी त्या नंतर ज्या योजने साठी अर्ज करायचा आहे. ती योजना निवडून त्या योजनेसाठी अर्ज करावा.
४)त्यानंतर मी अर्ज केलेल्या बाबी मध्ये तुम्ही पेमेंट करून तुमचा अर्ज पेमेंट केल्या नंतर अर्ज यशस्वीरित्या सबमिट होऊन जाईल. Mahadbt farmer Scheme 2022
Maha dbt farmer’s portel वर अर्ज केल्या नंतर काय करावे:-
महा डीबीटी (maha dbt) पोर्टल वर अर्ज केल्या नंतर ऑनलाईन पद्धतीने लॉटरी मध्ये जर तुमची निवड झाली तर तुम्हाला कागदपत्रे ही अपलोड करावी लागेल. सर्व कागदपत्रे अपलोड केल्या नंतर योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर अनुदान हे तुमच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यात येईल.
हे नक्की वाचा:- घरकुल योजना २०२२ नवीन घरकुल यादी जाहीर