शेतकरी गट नोंदणी कशी करायची? अटी पात्रता व कागदपत्रे | Atma shetkari gat nondani

केंद्र सरकार तसेच राज्य सरकार देशातील लोकांसाठी विविध योजना राबवित असते. या केंद्र तसेच राज्य सरकार मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ देशातील जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा व शेतकऱ्यांचा आर्थिक विकास व्हावा असे शासनाचे उद्दिष्ट असते. तसेच केंद्र तसेच राज्य सरकार आपल्या देशातील लोकांसाठी योजनांबरोबरच प्रशिक्षण तसेच मार्गदर्शन हे देण्याचे काम करत असते. आणि ह्या सर्व गोष्टी कोणत्याही वैयक्तिक शेतकऱ्यांना देणे अवघड जाते त्यामुळे शेतकरी गट जर असेल तर या योजनांचा लाभ शेतकरी गटांना व्यवस्थित पद्धतीने मिळवून देता येतो. आणि अनुदान सुद्धा वैयक्तिक शेतकऱ्याला न मिळता संपूर्ण शेतकऱ्यास मिळाल्यामुळे ते अनुदान सर्व शेतकरी व्यवस्थित पद्धतीने उपयोगी लावू शकतात.

 

शेतकरी गट नोंदणी कशी करायची? अटी पात्रता व कागदपत्रे | Atma shetkari gat nondani
शेतकरी गट नोंदणी कशी करायची? अटी पात्रता व कागदपत्रे | Atma shetkari gat nondani

 

त्याच प्रमाणे आपले महाराष्ट्र शासन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी प्रत्येक योजनेला शेतकरी गट असल्यास प्रथम प्राधान्य देत आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहा डी बी टी योजना पोक्रा योजना यांच्यासाठी शेतकरी गटांना अनेक योजना उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच शेतकरी गटांना प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे.

 

हे नक्की वाचा:- शेतातील बांध कोरणार्याला असा शिकवा कायदेशीर धडा

 

 

शेतकरी शेतकरी गट स्थापन करून शेती तसेच शेती पूरक उद्योग जसे की मत्स्य पालन, दुग्ध व्यवसाय, पशुसंवर्धन व्यवसाय गटा मार्फत करून लवकरच स्वतःची आणि संपूर्ण गटातील व्यक्तींची आर्थिक प्रगती करून घेऊ शकतात.

 

तुम्ही आत्मा अंतर्गत गट नोंदणी करू शकतात. आत्मा ही एक स्वायत्त संस्था आहे.कृषि संशोधक, विस्तार कार्यकर्ते, शेतकरी व इतर भागधारक यांची योग्य सांगड घालून त्यांचा अभ्यास करुन जिल्हा विस्तार आराखडा व स्थानीक गरजा व परिस्थितीशी निगळीत तंत्रज्ञान प्रसारणातील नाविण्यापुर्णतेशी परिचीत करणे (सुरुवात करणे) या करिता शिफारशी करुन या सर्वाना एकत्र ठेवण्याची जबाबदारी आत्माची आहे.

 

हे सुद्धा वाचा:- पाणलोट विकास योजना 2022

आत्मा मध्ये तालुका तसेच जिल्हा स्तरावरील अधिकारी , तसेच प्रगतिशील शेतकरी, शेतकरी मित्र हे शेतकरी गटास विविध बाबींसाठी मार्गदर्शन करतील. तसेच प्रशिक्षण आणि तांत्रिक सहाय्य करतील. तसेच शेतकऱ्यांच्या शेतात शेती शाळा घेऊन त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतील.

 

 

 

आत्मा अंतर्गत गट नोंदणी करिता अटी:-

१) आत्मा अंतर्गत स्थापन करण्यात येणाऱ्या एका गटा मध्ये 20-25 इतके शेतकरी असावे लागते.

 

२) आत्मा अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या गटामध्ये आलेल्या सर्व सदस्यांची बैठक ही महिन्यातून कमीत कमी एक वेळा तरी आयोजित केली पाहिजे.

 

३) आत्मा अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या गटामध्ये सर्व नोंदवह्या जसे बैठकांचे इतिवृत्त, बँक पासबूक  तसेच इतर कामकाजाची माहिती वेळोवेळी अपडेट करावी.

 

हे नक्की वाचा:- अतिवृष्टी नुकसान भरपाई नवीन यादी जाहीर

 

 शेतकरी गटांना अर्थसहाय्य:-

1. 5000 रुपये प्रत्येक गटाला कौशल्य विकास साठी सहाय्य म्हणून देण्यात येत असते.

 

2. आत्मा अंतर्गत स्थापन झालेल्या प्रत्येक गटास 10000 रुपये वीज भांडवल म्हणून देण्यात येते

 

3. आत्मा अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या गटांना कुक्कुट पालन, शेळी पालन, पशू संवर्धन इत्यादी व्यवसाय सुरू करण्यासाठी  10000 रुपये इतके भांडवल उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 

4. आत्मा अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या गटामध्ये जो गट उत्कृष्ट रित्या कार्य करणार अश्या गटास 20000 रुपये इतके पारितोषिक हे देण्यात येत असतेu

 

 

 

 

आत्मा यंत्रणेकडे गट नोंदणी करिता आवश्यक कागदपत्रे :-

शेतकरी गट नोंदणी करिता खालील कागदपत्रे आवश्यक असतात.

१)आत्मा अंतर्गत गट नोंदणी करिता सर्व सदस्यांचे वैयक्तिक अर्ज

२) आत्मा अंतर्गत गटाच्या प्रथम सभेचे इतिवृत्त

३) आत्मा अंतर्गत गट नोंदणी करणाऱ्या सर्व सदस्यांचा ७/१२ व ८ अ

४) सदस्याचे आधार कार्ड

५) गटाचा करारनामा

 

 

आत्मा अंतर्गत शेतकरी गट नोंदणी करिता लागणारी फी ही रु. १०० इतकी आहे.

 

 

एकंदरीतच गट शेती च्या माध्यमातून  शेतीस प्रोत्साहन देणे , शेतकऱ्यांचा आर्थिक विकास घडवून आणणे हे गट शेती च्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.

 

 

 

Leave a Comment