आपले सरकार सेवा केंद्र अर्ज सुरू, सेतू केंद्र | aaple sarkar seva kendra new application start

 

मित्रांनो आजच्या या पोस्ट मध्ये आपण आपले सरकार सेवा केंद्र साठी अर्ज सुरू झालेले आहेत, त्या विषयी माहिती पाहणार आहोत. Apale Sarkar Seva Kendra साठी अर्ज कसा करायचा ? कागदपत्रे संपूर्ण माहिती साठी हा लेख संपूर्ण वाचा.

आपले सरकार सेवा केंद्र अर्ज सुरू, सेतू केंद्र | aaple sarkar seva kendra new application start
आपले सरकार सेवा केंद्र अर्ज सुरू, सेतू केंद्र | aaple sarkar seva kendra new application start

 

आपले सरकार सेवा केंद्र यालाच csc centre तसेच सेतू केंद्र असे सुद्धा म्हणल्या जाते. हे आपले सरकार सेवा केंद्र आजच्या काळात खूप महत्वपूर्ण असे रोजगार मिळवून देणारे ग्राहक सेवा केंद्र आहे. या आपले सरकार सेवा केंद्र च्या माध्यमातून आपण केंद्र तसेच राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना आपण थेट ग्राहकांना पोहचवू शकतो. aaple sarkar seva kendra हे व्यक्तींना विविध प्रकारचे दाखले, तसेच इतर सेवा पुरवित असते. aaple sarkar seva kendra new application start


हे नक्की वाचा:- आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे काय असते? अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे, नियम व अटी संपूर्ण माहिती

Aple sarkar seva kendra new registration हे आता सुरू झालेले आहेत. Parbhani जिल्ह्यातील रिक्त आपले सरकार सेवा केंद्र साठी नवीन अर्ज हे मागविण्यात येत आहेत. या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र परभणी जिल्ह्यासाठी करावयाचा अर्ज कसा करायचा त्याची माहिती सुद्धा  दिलेला आहे. त्याच बरोबर रिक्त आपले सेवा केंद्र गावांची यादी सुद्धा दिलेली आहे. Aaple sarkar seva kendra साठी एकूण २१८ जागांकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत.

आपले सरकार सेवा केंद्र आवश्यक कागदपत्रे:-

जर तुम्हाला aaple sarkar seva kendra किंवा csc centre मिळवायचे असेल तर तुमच्या कडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

१) अर्जदाराचे आधार कार्ड

२) रहिवासी दाखला

३) MSCIT प्रमाणपत्र किंवा CCC प्रमाणपत्र झेरॉक्स प्रत

४) पदवी प्रमाणपत्र झेरॉक्स

५) CSC ID  प्रमाणपत्र( जर तुमच्याकडे csc सेंटर असल्यास) csc centre धारकास प्राधान्य

वरील सर्व कागदपत्रे सेतू केंद्र मिळविण्यासाठी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

हे नक्की वाचा:- आपले सरकार सेवा केंद्र अतींम पात्र यादी जाहीर

आपले सरकार सेवा केंद्र अर्ज प्रक्रिया:-

सेतू केंद्र/आपले सरकार सेवा केंद्र साठी नवीन अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने १५ मार्च २०२२ पासून २५ मार्च २०२२ दरम्यान करायचा आहे.

apale sarkar seva kendra (ASSK) परभणी जिल्ह्यातील करायचा ऑनलाईन अर्जाची लिंक खाली दिलेली आहे. त्या लिंक वर क्लिक करा आणि तुमचा ऑनलाईन अर्ज भरून घ्या.

 

Apale sarkar (csc)Online Application  Parbhani साथी इथे क्लिक करा.

आपले सरकार सेवा केंद्र रिक्त जागा ची यादी आणि जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

ही माहिती महत्वपूर्ण वाटत असल्यास तुमच्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा.