मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना यादी जाहीर | Matoshri gram samruddhi shet – panand raste yojana list

 

आजच्या या पोस्ट मध्ये आपण आपल्या राज्यातील ग्रामीण भागात शेतात जाण्यासाठी शेत रस्ते तसेच पाणंद रस्ते तयार करण्यासाठी राबविण्यात येत आलेली योजना ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना’ विषयी माहिती पाहणार आहोत. या Matoshri gram samruddhi shet – panand raste yojana ची लिस्ट ही जाहीर झालेली आहे.

 

"मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना" यादी जाहीर | Matoshri gram samruddhi shet - panand raste yojana list
मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना यादी जाहीर | Matoshri gram samruddhi shet – panand raste yojana list

 

 

आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने ही ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना’ राबविण्यास एक शासन निर्णय घेऊन ११ नोव्हेंबर २०२१ रोजी योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे.

 

हे नक्की वाचा:- मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना काय आहे? अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती

 

 

ही मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना मनरेगा व राज्य रोहयोच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत या पूर्वी अर्ज हे स्विकारण्यात आलेले होते. या योजने अंतर्गत शेत पाणंद रस्ते बांधण्यासाठी रुपये 9 लाख रुपये पर्यंत अनुदान हे देण्यात येत आहे.

 

मी समृध्द तर गाव समृध्द” आणि “गाव समृध्द तर माझा महाराष्ट्र समृध्द” ही संकल्पना या योजने ची आहे. एकंदरीतच ग्रामीण भागातील लोकांचा विकास करायचा असल्यास त्यांच्या शेतात जाण्यासाठी चांगला रस्ता असायला हवा. त्यामुळे शेतकरी त्यांचा शेतमाल वेळेवर होऊ शकतो शेत मालाची वाहतूक करू शकतो.

 

हे नक्की वाचा:- सिंचन विहीर अनुदान योजना महाराष्ट्र अर्ज सुरू

 

Matoshri gram samruddhi shet – panand raste yojana अंतर्गत ज्या शेत पाणंद रस्त्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे. त्याची लिंक आम्ही तुम्हाला या पोस्ट च्या शेवटी दिलेली आहे. सदर ग्रामपंचायतीने शेत पाणंद रस्त्यांचा आराखडा हा ग्रामसभेच्या मंजूरीने तयार करायचा आहे. त्यानंतर 31 मेपर्यंत शेत पाणंद रस्त्यांच्या आराखडा हा गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करायचा असून ते तुमच्या तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या शेत/ पाणंद रस्त्यांची लिस्ट ही 15 जूनपर्यंत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करतील.

 

हे नक्की वाचा:- शेतमाल तारण कर्ज योजना

आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व रस्त्यांच्या कामांची आराखडा यादी ही रोजगार हमी योजना सचिव यांच्या द्वारे ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या कडे पाठवण्यात येणार आहेत. त्यानंतर 15 ऑगस्ट पर्यंत शेत पाणंद रस्त्यांच्या कामांना निधी हा मंजूर करून देण्यात येणार आहे.

 

 

मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.