ई -पीक पाहणीला मुदतवाढ; अशी करा रब्बी ई पीक पाहणी | E Peek Pahani maharashtra

आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणी करून घेणे अनिवार्य झालेले आहेत. तुमच्या शेतातील पिकांच्या नोंदी आता तुम्हालाच ई पीक पाहणी च्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने करावयाचा आहे. आणि याची नोंद सातबारा उतारा वर येणार आहे आहे. आपल्या सातबारा वर पिकांची नोंद ही आता तलाठी द्वारे न होता ती थेट शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी च्या माध्यमातून करावयाची आहे.

 

ई -पीक पाहणीला मुदतवाढ; अशी करा रब्बी ई पीक पाहणी | E Peek Pahani maharashtra
ई -पीक पाहणीला मुदतवाढ; अशी करा रब्बी ई पीक पाहणी  E Peek Pahani maharashtra

 

रब्बी हंगाम २०२१-२२ साठी ई-पीक पाहणी ला मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना ई- पीक पाहणीच्या मोबाईल ॲप्लिकेशन वर ऑनलाइन पद्धतीने इ पीक पाहणी नोंदणी करताना तांत्रिक कारणामुळे अडचणी येत होत्या या गोष्टी लक्षात घेता रब्बी हंगाम 2021 -22 साठी ई-पीक पाहणी ला मुदतवाढ देण्यात आली आहे.

रब्बी हंगाम २०२१-२२ साठी ई-पीक पाहणी आता १५ मार्च पर्यंत करता येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही अजून पर्यंत ई पीक पाहणी केली नसेल तर अंतिम तारीख च्या आत करून घ्यावी. शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये जाऊन ई पीक पाहणी करायचे आहे. शेतामध्ये योग्य त्या पिकांची माहिती तसेच पिकांचे छायाचित्र काढून ते अपलोड करायचे आहे व ई पीक पाहणी पूर्ण करायची आहे. ई पीक पाहणी अंतर्गत खातेदारांची एकदाच नोंदणी होणार आहे.  E pik pahani maharashtra


हे नक्की वाचा:- अतिवृष्टी नुकसान भरपाई साठी केंद्र सरकारचा निधी वितरित 

 

शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांनी भरलेल्या माहितीची अचूकता तलाठी द्वारे चेक करण्यात येईल. त्यानंतर शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी ची माहिती ही डिजिटल सातबारामध्ये नमूद करण्यात येईल.

ई पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी e peek pahani चे mobile application डाऊनलोड करावयाचे आहे.

 

या e peek pahani साठी शेतकऱ्यांना आपल्या मोबाईल मध्ये  ई पीक पाहणी मोबाईल ॲप  download करायचे आहे.

शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करण्यासाठी त्यांच्या मोबाईल मध्ये वरील ई पीक पाहणी अँप डाऊनलोड करून त्यामध्ये ई पीक पाहणी करून घ्यावयाचे आहे. ई पीक पाहणी करताना शेतकऱ्यांनी सिंचन पद्धत निवडायची आहे. तसेच त्यांच्या शेतीतील वृक्षांची माहिती देऊ शकतात.

हे नक्की वाचा:- ई – पीक पाहणी कशी करायची या विषयी संपूर्ण माहिती साठी इथे क्लिक करा.

राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी E Peek Pahani लवकरात लवकर करून घ्यावी .