खरीप पिक विमा योजना २०२१ निधी मंजूर | kharip pik vima 2021 maharashtra

 

शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या  शेतमालाला हवामानाच्या विविध धोक्यामुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी म्हणजे शेतकऱ्यांच्या शेती पिकांस विमा सुरक्षा कवच प्रदान करण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. हवामान धोक्यामुळे होणारे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळून पिक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विमासुरक्षा कवच प्रदान करणे या उद्देशाने प्रधान मंत्री पीक विमा योजना ही राबविण्यात येत आहे.kharip pik vima 2021 nidhi manjur

 

 

खरीप पिक विमा योजना २०२१ निधी मंजूर | kharip pik vima 2021 maharashtra
खरीप पिक विमा योजना २०२१ निधी मंजूर | kharip pik vima 2021 maharashtra

 

 

 

आपल्या महाराष्ट्र राज्य वर्ष 2021 मध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली होती. त्यामुळे आपल्या महाराष्ट्र राज्याचे संपूर्ण शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे नुकसान झालेली होते. बऱ्याच शेतकऱ्यांची संपूर्ण पीक नष्ट झालेले होते. मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत खरीप पिक विमा हा काढलेला होता. अशा शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत kharip pik vima 2021 nuksan bharpai वितरित करण्यासाठी तसेच ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा क्लेम केलेला होता. अशा शेतकऱ्यांचे पीक विमा क्लेम चे दावे निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा पीक विम्याचा हप्ता म्हणून पीक विमा कंपनीस असलेली निधीची गरज लक्षात घेऊन वर्ष २०२१ साठी खरीप पिक विमा योजना (kharip pik vima yojana 2021) साठी निधी वितरित करण्यात आलेला आहे.

 

 

हे नक्की वाचा:- अतिवृष्टी नुकसान भरपाई साठी केंद्र शासनाचा निधी मंजूर 

 

 

महाराष्ट्र शासनाच्या 9 मार्च 2022 रोजी प्रकाशित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार खरीप पिक विमा योजना (kharip pik vima yojana 2021) साठी  ८६५.९५ कोटी इतके रुपये रक्कम ही वितरित करण्यासाठी मंजुरी ही देण्यात आली आहे.

 

 

प्रधानमंत्री खरीप पिक विमा योजनेसाठी निधी वितरित करण्यासंबंधी चा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 

प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या खरीप पिक विमा योजना साठी महाराष्ट्र शासनाच्या हप्त्याची रक्कम ८६५.९५ कोटी इतके रुपये हे खालील पिक विमा कंपनी ला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याकरिता मंजूर करण्यात येत आहे. भारतीय कृषी विमा कंपनी, इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, भारतीय अक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, बजाज अलियांस इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तसेच एचडीएफसी इग्रो इन्शुरन्स कंपनी लिमिटेड वरील सहा कंपनीमार्फत महाराष्ट्र राज्यामध्ये खरीप पिक विमा योजना 2021 हे राबवण्यात आलेली होती.

 

हे नक्की वाचा:- अतिवृष्टी नुकसान भरपाई नवीन याद्या प्रसिद्ध झाल्या पहा तुमचे नाव

 

आता पीक विमा कंपन्यांना महाराष्ट्र शासनातर्फे ही रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे त्यामुळे लगेच शेतकऱ्यांना खरीप पिक विमा नुकसान भरपाई ( kharip pik vima nuksan bharpai) रक्कम ही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.