आपल्या महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प हा काल आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी विधी मंडळात सादर केला आहे. या महाराष्ट्र अर्थसंकल्प 2022-23 मध्ये शेतकरी बांधवांना कोणत्या गोष्टींचा लाभ मिळणार, त्यांच्या विषयी काय तरतुदी तसेच योजना आहे; हे या पोस्ट मध्ये आपण पाहत आहोत.
शेतकऱ्यांना मिळणार ४४ हजार विहिरी ; अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना खुशखबर | Maharashtra Budget 2022 |
Maharashtra budget 2022-23 मध्ये शेतकरी बांधवांसाठी रोजगार हमी योजने करिता 1 हजार 754 कोटी इतका निधी हा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागात रोजगार हमी योजना अंतर्गत अनेक कामे करता येणार आहेत. तसेच फलोत्पादनासाठी महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२२ – २३ मध्ये 540 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे.
हे नक्की वाचा:- पोक्रा योजना काय आहे? अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती
महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२२ – २३ सिंचन विहिरीं साठी तरतूद:-
महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२२ – २३ मध्ये राज्यात सिंचन विहिरींच्या कामांना गती देण्यासाठी तसेच शेतकऱ्यांनी कोरडवाहू शेतीचा न करता सिंचित शेती करून आपला आर्थिक विकास घडवून आणावा या साठी 43 हजार 902 सिंचन विहिरींची कामे ही करण्यात येणार आहेत.
त्यासाठी धडक सिंचन विहिर योजना राबविण्यात येत आहे. धडक योजने अंतर्गत नागपूर विभागातील 6 जिल्ह्यात एकूण 24 हजार ६१४ इतक्या सिंचन विहिरींच्या धडक योजने अंतर्गत मंजुरी देण्यात येणार आहे.
हे नक्की वाचा:- सिंचन विहीर योजना काय आहे? अर्ज करण्याची पद्धत, कागदपत्रे संपूर्ण माहिती
त्याच प्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्यात धडक सिंचन योजना बरोबरच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून(मनरेगा) manrega 43 हजार 902 सिंचन विहिरींची कामे हाती घेतली आहे.
महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२२ – २३ मध्ये शेती क्षेत्रासाठी इतर तरतूद:-
महाराष्ट्र शासनाच्या वतीने वर्ष 2022- 2023 करिता 1 लाख हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे उद्दीष्ट हे ठेवण्यात आलेले आहेत.
Maharashtra budget 2022-23 मध्ये फळबाग लागवड योजने मध्ये ऍव्हॅकॅडो, ड्रॅगन फ्रुट, द्राक्षे इत्यादी फळ पिके तसेच अन्य महत्त्वाच्या मसाला पिकांचा नव्याने समावेश करण्यात येत आहे.
हे नक्की वाचा:- बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना काय आहे?
तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता चांगला असावा या उद्देशाने शेत पाणंद रस्ते सुधारणा करण्यात येणार आहे. यासाठी मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना ही राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी आवश्यक असलेला निधी हा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेत पाणंद रस्ते येण्यासाठी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.