शेतकऱ्यांना ड्रोन खरेदी साठी अनुदान अर्ज सुरू | Drone Subsidy yojana for maharashtra farmer’s

 

आजच्या या पोस्ट मध्ये आपण ड्रोन खरेदी साठी अनुदान योजना या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. ड्रोन सबसिडी योजना अंतर्गत अर्ज कसा करायचा? पात्रता तसेच अर्ज कुठे करावा ? या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळणार आहे. त्यामुळे ही पोस्ट शेवट पर्यंत नक्की वाचा.

 

शेतकऱ्यांना ड्रोन खरेदी साठी अनुदान अर्ज सुरू | Drone Subsidy yojana for maharashtra farmer's
शेतकऱ्यांना ड्रोन खरेदी साठी अनुदान अर्ज सुरू | Drone Subsidy yojana for maharashtra farmer’s

 

ड्रोन सबसिडी योजना (Drone Subsidy yojana) :-

आपल्या देशातील केंद्र सरकारच्या अंतर्गत आपल्या भारत देशातील शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करावी? शेती क्षेत्रात प्रत्यक्ष आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा व शेती क्षेत्राचे आधुनिकीकरण होऊन शेती क्षेत्राचा विकास व्हावा, तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यादृष्टीने केंद्र सरकार नवीन शेतकरी धरणे आखत आहेत. केंद्र तसेच राज्य सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न हे दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

 

 

आपल्या देशातील शेतकऱ्यांनी ड्रोन द्वारे फवारणी करावी यासाठी सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने नवीन मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ड्रोन सबसिडी योजना ही राबविण्यात येत आहे.

 

हे नक्की वाचा:- राज्यातील ओबीसी बांधवांना कर्ज योजना

ड्रोन सबसिडी योजना अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी पदवीधारक, शेतकरी सहकारी संस्था, ड्रोन आधारित सेवा सुविधा केंद्र स्थापनेसाठी अर्थसहाय्य लाभ घेऊ शकतील.Drone Subsidy SMAM

 

 

ड्रोन सबसिडी योजना च्या मार्गदर्शक सूचना वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

 

शेतकरी मित्रांनो शासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ड्रोन वर आधारित प्रात्यक्षिके घेण्यासाठी अनुदान हे देण्यात येत आहे. कृषी विद्यापीठे, कृषि विज्ञान केंद्र यांना ड्रोन व त्याचे साहित्य खरेदीसाठी १०० टक्के अनुदान हे शासनातर्फे देण्यात येत आहे. किंवा १० लाख रुपये पर्यंत अनुदान हे देण्यात येत आहे. याचा वापर शेतकऱ्यांच्या शेतात ड्रोन वर आधारित प्रात्यक्षिके घेण्यासाठी करता येणार आहेत.Drone subsidy in Maharashtra, maharashtra drone Yojna, drone scheme maharashtra

 

हे नक्की वाचा:- ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र २०२२ अर्ज सुरू

तसेच शेतकरी उत्पादक कंपनीस शेतामध्ये ड्रोन चा वापर करून शेतीचा विकास साधता यावा व शेतकऱ्यांच्या शेतात ड्रोन वर आधारित प्रात्यक्षिके घेऊन शेतकरी बांधवांना शेती क्षेत्रातील कामे ही ड्रोन कशी करायची या विषयी माहिती द्यावी या उद्देशाने शेतकरी उत्पादक कंपनीस शासनातर्फे ड्रोन व त्याचे साहित्य खरेदीसाठी ७५ टक्के अनुदान हे देण्यात येत आहे.

 

 

 

जर शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी विद्यापीठे, कृषि विज्ञान केंद्र यांना कृषी ड्रोन खरेदी करायचे नाहीत परंतु शेतकऱ्यांच्या शेतात कृषी ड्रोन प्रात्यक्षिक करण्यासाठी हाय-टेक हब/निर्माते/ स्टार्ट-अप यांचे कडून जर ड्रोन भाडयाने घ्यावयाचे असल्यास या साठी सुद्धा शासनातर्फे अनुदान हे देण्यात येत आहे. या संस्थांना 6000 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे देण्यात येणार आहेत. हा खर्च प्रात्यक्षिक घेण्यासाठी लागणाऱ्या विविध बाबींसाठी खर्च करता येतो.

 

ड्रोन सबसिडी योजना महाराष्ट्र अर्ज करण्याची अंतिम तारीख तसेच अर्ज करण्याचे ठिकाण:-

 

Agriculture Drone Subsidy yojana maharashtra अंतर्गत अर्ज करावयाचा असल्यास त्याची अंतिम तारीख ही 31 मार्च, 2023 ही आहे. दिलेल्या मुदतीत अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करावयाचे आहेत.

 

हे सुद्धा वाचा:- शेतकरी गट नोंदणी कशी करायची? 

 

ज्या अर्जदारांना या Drone Subsidy yojana maharashtra अंतर्गत लाभ घ्यायचा असेल त्यांनी अर्ज हा तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत जिल्ह्यातील अधिक्षक कृषि अधिकारी यांच्याकडे सादर करावयाचा आहे.