मित्रांनो आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक नवीन शासन निर्णय हा प्रकाशित केलेला आहे. त्यानुसार आता आपल्या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जमिनीला अद्वितीय ओळख क्रमांक मिळणार आहे. ULPIN scheme Maharashtra 2022 आपल्या महाराष्ट्र राज्यातील जमिनींना आता एक अद्वितीय भूभाग क्रमांक देण्यात येणार आहे. या संबंधित शासन निर्णय हा आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने २८ जुलै २०२२ प्रकाशित केलेला आहे. आजच्या पोस्टमध्ये आपण आता जमिनीला सुद्धा मिळणार आधार कार्ड नवीन शासन निर्णय ULPIN Scheme 2022 Maharashtra याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
ULPIN scheme 2022 maharashtra शासन निर्णय डाऊनलोड करा –
या ULPIN scheme maharashtra 2022 अंतर्गत जमिनींना एक अद्वितीय भूभाग क्रमांक देण्यात येणार आहे. त्या संबंधित शासन निर्णय हा महाराष्ट्र सरकारच्या वतीने 28 जुलै 2022 ला प्रकाशित केला आहे, तो download करण्याची लिंक खाली दिलेली आहे.
DOWNLOAD GR PDF
ULPIN Scheme 2022 Maharashtra :-
डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड माँडनयझेशन प्रोग्राम हा केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात आला होता. हा प्रोग्राम केंद्र सरकारच्या भूमी संसाधन विभागाने २४ डिसेंबर २०२२ रोजी राबवून सर्व राज्यांना वरील प्रोग्राम अंतर्गत संगणकीकृत झालेल्या अधिकार अभिलेखासाठी अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक देण्याबाबत निर्देश दिलेले होते.
हे नक्की वाचा:- आता या शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार 50 हजार रुपये अनुदान
केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या या निर्देश नुसार आता राज्यातील प्रत्येक जमिनीला हे ULPIN नंबर देता येणार. त्याकरिता सर्व राज्यांनी जिओ रेफ्रन्सिंगचे कार्य पूर्ण करून घ्यायला पाहिजे. त्यानंतर राज्यातील जमिनीला अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक(ULPIN Number) देता येणार आहे.
या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान
अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक कसा असेल?
आपल्या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जमिनीला देण्यात येणारा अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक हा 11 अंकाचा असणार आहे. हा क्रमांक विशिष्ट पद्धतीने तयार करण्यात येणार आहे.
हे नक्की वाचा:- ट्रॅक्टर अनुदान योजना मध्ये करण्यात आले हे महत्वपूर्ण बदल
त्यामुळे आता आपल्या जमिनींना सुद्धा आधार कार्ड प्रमाणेच एक विशिष्ट क्रमांक हा देण्यात येणार आहे. या योजनेची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता लवकरच आपल्या महाराष्ट्र राज्यातील जमिनींना अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक देण्यात येणार आहे.
ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण पोस्ट करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.