मित्रांनो मकर संक्रांती हा एक आपल्या हिंदू धर्मामध्ये साजरा करण्यात येणारा महत्त्वाचा सण आहे. मकर संक्रांत हा नवीन वर्षातील पहिला सण असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा धनु राशि मधून मकर राशि मध्ये प्रवेश करत असतो. आपण साजरा करत असलेल्या अनेक सणांपैकी मकर संक्रांतीच्या सणाला एक वेगळेच महत्त्व प्राप्त आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण मकर संक्रांत 2023(Makar Sankranti 2023) बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
मकर संक्रांत 2023 कधी आहे? When is Makar Sankranti 2023?
मित्रांनो यावर्षी मकर संक्रांत 2023 ही 15 जानेवारी 2023 या दिवशी आहे. मकर संक्रांत हा सण जानेवारी महिन्यात येत असतो. नवीन वर्ष लागल्यानंतर त्या नवीन वर्षामध्ये येणारा पहिला सण हा मकर संक्रांती हा असतो. Makar Sankranti 2023 in Marathi
मकर संक्रांति माहिती :-
मकर संक्रांती हा नवीन वर्षातील पहिला सण असल्यामुळे या सणाला खूप महत्त्व आहे. या सणापासून अनेक सणांची सुरुवात होत असते. एकमेकांमध्ये स्नेह निर्माण करणारा मकर संक्रांति हा एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी तिळगुळ एकमेकांना वाटण्यात येत असते. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणून सर्वांना स्नेहाने शुभेच्छा देण्यात येत असतात. सर्व मित्रमंडळी तसेच लहान मुले मोठी माणसे गावातील महिला मंडळी एकमेकांच्या घरी तिळगुळाचा कार्यक्रम आयोजित करीत असतात. आणि तिळगुळ वाटप करून एक छोटीशी भेट म्हणून वस्तू सुद्धा वितरण करत असतात. त्याला वाण देणे असे म्हणतात. आपण जाणून घेत आहोत Makar Sankranti information in Marathi संपूर्ण माहिती.
मकर संक्रांतीच्या वाणांमध्ये ऊस, बोर, हरभरा तसेच तिळगुळ व गहू यांचा समवेश असतो. संक्रांति माता ही आई जगदंबेचे स्वरूप आहे. ही संक्रांति देवी मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षी वेगवेगळ्या वाहनांवर बसून येत असते. संक्रांति मातेच्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र असतात. मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्यात येते. मकर संक्रांतीच्या सणाच्या दिवशी पतंग उडवण्याचे एक वेगळेच महत्त्व आहे.
मकर संक्रांति 2023 शुभ मुहूर्त Makarsankranti Shubh Muhurt :-
मकर संक्रांति 2023 तारीख Makar Sankranti 2023 Date :
मकरसंक्रांती 2023 तारीख ही 15 जानेवारी 2023 आहे. या दिवशी रविवार आहे.
मकर संक्रांति शुभ मुहूर्त:
मकर संक्रांति 2023 चा शुभ मुहूर्त हा सकाळी 07:36 ते संध्याकाळी 06:31 पर्यंत आहे. मकर संक्रांतीच्या एकूण कालावधी हा 10 तास 55 मिनिटे इतका आहे.
मकर संक्रांति 2023 चा महापुण्य काळ हा सकाळी 07:36 ते सकाळी 09:25 पर्यंत आहे. Makar Sankranti 2023 च्या महापुण्य काळचा एकूण कालावधी हा 1 तास 49 मिनिट आहे.
मकर संक्रांतीची विविध नावे Makar Sankranti Mahiti Marathi:-
मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात या सणाला मकर संक्रांती या नावाने ओळखले जाते. Makar Sankranti ची विविध नावे आहेत प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या नावाने मकर संक्रांत साजरी केली जाते.
मकर संक्रमण या नावाने कर्नाटक राज्यात तर पश्चिम बंगाल मध्ये पौष संक्रांती या नावाने तर हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब या राज्यात माघी या नावाने तर गुजरात आणि उत्तराखंडमध्ये उत्तर नारायण या नावाने Makar Sankrant 2023 हा सण साजरा करण्यात येत असतो.
मकर संक्रांती या सणाचे महत्त्व Importance of Makar Sankranti Festival:-
मित्रांनो मकर संक्रांति हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. प्रत्येक नवीन वर्षामध्ये येणारा पहिला सण हा मकर संक्रांत असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो. मराठी पौष महिन्यामध्ये हा सन येत असतो. अनेक जण मकर संक्रांतीच्या दिवशी तपश्चर्या किंवा जप करत असतात. मकर राशीचे स्वामी शनिदेव आहेत. मकर संक्रांतीच्या सणाला उत्तर नारायणी उत्सव असे सुद्धा म्हटले जाते. कारण की या दिवशी सूर्य देवाने उत्तर नारायणी चळवळ सुरू केलेली होती. Makar Sankranti information Marathi
मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्य हा पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाकडे या दिशेने जात असतो. मकर संक्रांतीच्या सणाच्या वेळेस शेतकऱ्यांची पीक कापणी ला येत असते, यामुळे या सणाला कापणीचा असं देखील म्हटले जाते. मकर संक्रांती या सणाला वेगवेगळे महत्त्व असून देशातील प्रत्येक भागामध्ये हा सण वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या नावांनी साजरा करण्यात येतो.
मकर संक्रांत या सणाबद्दल पौराणिक कथा Story Of Makar Sankranti festival:-
मित्रांनो हिंदू धर्माच्या प्रत्येक सण साजरा करण्यामागे पौराणिक कथा असते. मकर संक्रांत या सणाला सुद्धा पौराणिक कथा आहे. मकर संक्रातीच्या पौराणिक कथेनुसार मकर संक्रांत या दिवसापासून स्वर्गाची दरवाजे उघडतात आणि स्वर्गाचा दिवस सुरू होतो. मकर संक्रांत या सणाच्या दिवशी भगवान विष्णू यांनी असूरांचा पराभव करून पृथ्वीवर त्यांचा विजय मिळवला होता असे मानण्यात येते. केव्हापासूनच म्हणजेच भगवान विष्णू यांनी असूरांवर मिळवलेल्या या विजयाचे प्रतीक म्हणून मकर संक्रांतीच्या हा सण साजरा करण्यात येतो. Makar Sankranti Mahiti Marathi
मकर संक्रांत आणि तिळगुळ Information of Makar Sankranti in Marathi :-
मित्रांनो मकर संक्रांतीच्या वेळेस सर्वात जास्त बोलले जाणारे वाक्य म्हणजे तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. एकमेकांना गोड असलेले तिळगुळ वाटून नात्यांमध्ये सुद्धा असाच गोडवा राहावा, आणि प्रत्येकांसोबत स्नेहपूर्ण संबंध असावे हा या मकर संक्रांतीच्या निमित्त तिळगुळ वाटण्याचा उद्देश असतो.
Makar Sankranti च्या वेळेस तिळगुळ वाटण्याची वैज्ञानिक कारण म्हणजे मकर संक्रांतीच्या वेळेस थंडीचे वातावरण असते आणि तीळ व गूळ हे पदार्थ उष्ण असतात. एकदम कडाक्याच्या थंडीमध्ये आपल्या शरीराला स्निग्ध आणि उष्ण पदार्थांची आवश्यकता असते. आणि त्यामुळे तिळगुळ हे शरीरासाठी महत्वाचे ठरते.
मकर संक्रांत आणि पतंग उडवणे:
मित्रांनो आपल्या देशामध्ये पतंग उडवण्याचा जुना इतिहास आहे. प्राचीन धार्मिक ग्रंथांमध्ये सुद्धा पतंग उडवण्याचा प्रकार आढळून आलेला आहे. खास करून मकर संक्रांतीच्या वेळेस पतंग उडवण्याची प्रथा आपल्या देशात आहे. Makar Sankrant Marathi हा सण आपण तिळगुळ वाटून तसेच पतंग उडवून साजरा करत असतो. अनेक लोक त्यांच्या छतावर जाऊन या दिवशी पतंग उडवत असतात. मोठ्या उत्साहात प्रत्येकाच्या घरावर आपल्याला पतंग उडताना दिसते.
पतंग उडवण्याची वैज्ञानिक कारण लक्षात घेतले तर पतंग उडवण्यामुळे शरीराला सूर्यप्रकाश मिळतो तसेच आपले शरीर निरोगी राहते. त्यामुळे मकर संक्रांतीच्या सणाला पतंग उडवण्याची प्रथा आहे.