महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत वर्ष 2022-23 करिता अनुदान मिळविण्यासाठी अर्ज सुरू झालेले आहेत. रोहयो ही योजना या वर्षासाठी राबविण्यात येणार आहे. त्यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत व्हर्मी कंपोष्ट, नाडेप कंपोष्ट, शेततळे व फळबाग / फुलपिके लागवड या घटकाचा लाभ देण्यासाठी वर्ष 2022-23 करिता नवीन अर्ज सुरू झालेले आहेत.
Table of Contents
मनरेगा योजनेचे उद्दिष्ट हे गावातील प्रत्येकाला रोहयो अंतर्गत काम देऊन गावातील लोकांना रोजगार देऊन गावात समृद्धी आणणे होय. या मनरेगा अंतर्गत ज्यांच्याकडे जॉब कार्ड आहेत, अश्या नागरिकांना या योजने अंतर्गत लाभ देण्यात येत आहे. या योजने अंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदार कडे 0.05 हेक्टर ते जास्तीत-जास्त 2 हेक्टर पर्यंत जमीन असावी लागते.
मनरेगा योजना 2022 अर्ज कुठे करायचा?
मनरेगा योजना 2022 अंतर्गत ज्यांना लाभ घ्यायचा असेल त्यांनी विहित नमुन्यातील अर्ज हा गावातील ग्रामपंचायतीमध्ये करायचा आहे.
मनरेगा योजना 2022 आवश्यक कागदपत्रे
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
1. 7/12 आणि 8 अ उतारा
2. बँक अकाउंट
3. आधार कार्ड
4. जॉब कार्ड
वरील कागदपत्रे ही महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी आवश्यक आहेत.
मनरेगा योजना अनुदान
सध्या मनरेगा योजना अंतर्गत शेततळे व फळबाग/ फुलपिके, नाडेप कंपोष्ट, व्हर्मी कंपोष्ट ह्या योजने करिता अनुदान मिळविण्यासाठी अर्ज सुरू झालेले आहेत. त्यामुळे वरील मनरेगा अंतर्गत योजना साठी खालील दर्शविल्याप्रमाणे अनुदान हे देय असणार आहे.
नाडेप कंपोष्ट- अनुदान हे 10537 रुपये प्रति युनिट
व्हर्मी कंपोष्ट- अनुदान हे 11944 रुपये प्रति युनिट
फळबाग/ फुलपिके – अनुदान हे जास्तीत जास्त 2 लाख रुपये प्रति हेक्टर
शेततळे – अनुदान हे आकारमानानुसार 60000 ₹ ते 3 लाख रुपये पर्यंत
वरील प्रमाणे अनुदान हे महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत देण्यात येत आहेत.
मनरेगा योजना संपर्क:-
मनरेगा योजना अंतर्गत अर्ज करायचा असल्यास ग्राम पंचायत मध्ये भेट देऊ शकतात. त्याच प्रमाणे अधिक माहिती हवी असल्यास तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधू शकतात.
मनरेगा योजना अंतर्गत अनुदानातील अंतर्भुत बाबी
खड्डे तयार करणे, जमीन तयार करणे, पीक संरक्षण व पाणी देणे इ, आंतरमशागत, खते देणे, कांड्या / कलमांची बीले व नांगी भरणे, या सर्व बाबी ह्या रोहयो अंतर्गत अंतर्भुत बाबी आहेत.
हे नक्की वाचा:- कोणत्याही शासकीय विभागाची तक्रार अशी करा ऑनलाईन
मनरेगा अंतर्गत अनुदान वाटप प्रक्रिया
मनरेगा(महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना) अंतर्गत अनुदान हे लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.
मनरेगा अर्ज नमुना डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना विषयीची ही माहिती आवडल्यास इतरांना शेअर करा. अश्याच महत्वपूर्ण पोस्ट करिता आमच्या वेबसाईटवर भेट देत चला.