कापूस सोयाबीन दर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर काय आहेत? पहा संपूर्ण माहिती | Kapus Soyabin

अगदी तोंडावर दिवाळीचा सण येऊन पोहोचलेला आहे, अश्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात शेतीमालाची विक्री करण्यासाठी बाजारामध्ये गर्दी लागलेली आहे, दिवाळी सण साजरा करण्याच्या निमित्ताने शेतकरी शेतीमालाची विक्री करीत आहे व, अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन पीकाला कशा प्रकारचा भाव मिळत आहे हे जाणून दिली अत्यंत महत्त्वाचे होईल.

यावर्षी कापूस व सोयाबीन पिके मोठ्या प्रमाणात धोक्यात आलेली आहे, पावसाचा अभाव राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात जाणवत होता व त्यामुळे जागच्या जागेवरच शेती पिके करपून गेलेली होती, अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळणे अपेक्षित आहे. तसेच आता बाजारामध्ये कापूस व सोयाबीन पिकाची आवक मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

सध्याच्या स्थितीमध्ये सोयाबीनला थोड्या चांगल्या प्रमाणात भाव मिळत आहे गेल्या काही दिवसांमधील भाव, व आता मिळत असलेल्या सोयाबीनचा भाव, यामध्ये मोठ्या प्रमाणात फरक जाणवतो सध्याच्या स्थितीमध्ये पाच हजारापासून ते साडेपाच हजाराच्या आत मध्ये सोयाबीनला भाव मिळत आहे.

राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचे पीक घेण्यात येते व सध्याच्या स्थितीमध्ये कापसाला 6050 रू ते 7220 एवढा दर मिळत आहे त्यामुळे एवढे दर मिळत असून सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतीमालाची विक्री शेतकऱ्यांकडून चालू आहे कारण दिवाळीचा सण अगदी जवळ येऊन पोहोचलेला आहे अशा प्रकारे बाजारामध्ये कापूस आणि सोयाबीन पिकाची स्थिती आहे.

कापूस सोयाबीन दर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर काय आहेत? पहा संपूर्ण माहिती | Kapus Soyabin

व्यवसाय चालू करण्यासाठी भांडवल हवय, भांडवल उपलब्ध करण्यासाठी या योजनांचा घ्या लाभ