यावर्षी पिक विमा योजनेमध्ये अनेक शेतकऱ्यांनी भाग घेतलेला आहे तसेच खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा खंड पडलेला असताना शेतकऱ्यांना पिक विमा नुकसार भरपाई मिळणे अपेक्षित aआहे व राज्यातील अनेक जिल्ह्यातील महसूल मंडळांना पात्र ठरविण्यात आलेले आहे त्यामुळे लवकरच नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात येणार आहे.
अनेक शेतकरी पिक विमा नुकसान भरपाई मध्ये पात्र ठरलेले असले तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार की नाही हा मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे कारण नुकसान भरपाई साठी पात्र झालेल्या शेतकऱ्यांना आपल्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. बँक खात्याशी आधार कार्ड लिंक असायला हवे हे अनिवार्य करण्याची विनंती कृषी विभागाअंतर्गत करण्यात आलेली होती.
अनेक शेतकऱ्यांनी बनावट पीक विमा काढलेला होता त्यामध्ये अनेक प्रकारच्या गैर वर्तवनुकी समोर येईल,अशा प्रकारचा एक प्रयत्न घेण्यात आलेला आहे,शेतकऱ्यांच्या खात्यावर संपूर्ण तपशील व बँक खाते मात्र इतरांचे ठेवून मोठ्या प्रमाणात बनावट अर्ज करण्यात आलेपेले होते,व या अर्जांचा खुलासा अर्थातच आधार लिंकच्या निर्णयाने होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आधार कार्ड लिंक करणे, अत्यंत गरजेचे आहे, त्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा ची रक्कम जमा होणार नाही.
व्यवसाय चालू करण्यासाठी भांडवल हवय, भांडवल उपलब्ध करण्यासाठी या योजनांचा घ्या लाभ |