राज्यातील या बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळाला उच्चांक दर | Soybean Rate

राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन घेतल्या जाते परंतु शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला भाव मिळत नसल्याने शेतकरी मात्र चिंतेत झालेली आहे, अशातच एक भर पडलेली आहे ती म्हणजे सोयाबीन पिकावरील पिवळा मोझेक रोगाची भर पडलेली आहे या रोगामुळे राज्यातील विविध भागांमध्ये सोयाबीनची पिके पिवळी पडून 50 टक्के पेक्षा जास्त उत्पादनामध्ये घटनेच्या शक्यता सुद्धा तज्ञांच्या मते वर्तवल्या जात होत्या.

सोयाबीनचे दर मोठ्या प्रमाणात कमी झालेले असताना वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दराला उच्चांक पातळी मिळालेली आहे, तसेच मागील काही काळामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये घसरून होण्याचे मुख्य कारण म्हणजे केंद्र शासना अंतर्गत सोयाबीन तेल तसेच डीओसी आयात करण्याची धोरण जाहीर करण्यात सोयाबीनच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली होती.

यापूर्वीचे सोयाबीनचे दर जास्तीत जास्त 4 हजार 100 रू पर्यंत होते, व या दरामध्ये सोयाबीन विकून शेतकऱ्यांना सोयाबीन पिकावर होणारा खर्च सुद्धा काढता येणे शक्य होत नव्हते, अशा परिस्थितीमध्ये वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला उच्चांक दर मिळालेला आहे व हा दर 5000 पेक्षा जास्त म्हणजेच 5451 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे मिळाला.

वाशीम बाजार समितीमध्ये तब्बल 15000 क्विंटल सोयाबीनची आवक झालेली आहे तसेच सोयाबीनला मिळालेला भाव हा उच्च पातळीचा असून 5451 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे मिळाला त्यामुळे अर्थातच दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सोयाबीनच्या दरामध्ये चांगल्या प्रकारे वाढ झालेली आहे.

राज्यातील या बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळाला उच्चांक दर | Soybean Rate

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 30 नोव्हेंबर पर्यंत कृषी अवजारांसाठी अर्ज करता येणार