या जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळांमध्ये सोयाबीनचा 25 टक्के अग्रीम पिक विमा मिळणार, शेतकऱ्यांसाठी तब्बल 311 कोटींचा निधी | Advance Pick Insurance

यावर्षी राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा खंड पडलेला होता अशा परिस्थितीमध्ये खरीप हंगामातील कापूस पीक तसेच सोयाबीन सारखी पिके मोठ्या प्रमाणात बाधीत झालेली होती, व अशा प्रकारची स्थिती नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा निर्माण झालेली होती. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अग्रीम पिक विमा देण्यात यावा अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला होता.

पिक विमा कंपनीला राज्यातील सर्व जिल्ह्यांना अग्रीम पिक विमा देण्यात यावा अशा प्रकारचे आदेश दिलेले असले तरी सुद्धा पिक विमा कंपनीने नांदेड जिल्ह्याच्या अग्रीम पीक विमा बाबतचे आक्षेप मांडलेले होते, परंतु नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा 21 दिवसापेक्षा जास्त काळ पावसाचा खंड तसेच 50 टक्के पेक्षा जास्त उत्पादनात घट झालेली आहे अशा प्रकारची माहिती समितीमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून पुढे आली.

नांदेड जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळ अग्रिम पिक विमा साठी 19 सप्टेंबरला झालेल्या सुनावणी नुसार सोयाबीन पिकासाठी पात्र ठरविण्यात आलेले आहे, त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील एकूण 93 महसूल मंडळांना सोयाबीनच्या अग्रीम पीक विमा साठी 311 कोटीची रक्कम देण्यात येईल.

एकंदरीत सांगायचे झाल्यास नांदेड जिल्ह्यात झालेल्या पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांना अग्रीम पीक विम्याची रक्कम मिळाल्यानंतर थोड्या प्रमाणात दिलासा मिळण्यास मदत होणार आहे, नांदेड जिल्ह्यातील 8.50 लाख शेतकरी विमाधारक आहेत, व नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रीम पीक विम्याची रक्कम लवकरच देण्यात येईल.

या जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळांमध्ये सोयाबीनचा 25 टक्के अग्रीम पिक विमा मिळणार, शेतकऱ्यांसाठी तब्बल 311 कोटींचा निधी | Advance Pick Insurance

कापूस सोयाबीन दर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर काय आहेत? पहा संपूर्ण माहिती