जवळपास सर्व शेतकरी बांधवांची सोयाबीन आता काढणीस आलेले असून दरवर्षीप्रमाणे ज्यावेळेस शेतकऱ्यांची सोयाबीन निघते त्यावेळेस शेतकरी बाजारामध्ये सोयाबीन विकण्याकरिता आणतात व त्यामुळे बाजार समितीमधील आवक वाढल्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात चढ उतार होत असतो. गेल्या वर्षी च्या तुलनेत सोयाबीनचे भाव अतिशय कमी असून शेतकऱ्यांना मागील ११ वर्षापूर्वीच्या दरामध्ये सोयाबीन विकावे लागत आहे.
सलग तीन ते चार दिवसांपासून राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये थोड्या प्रमाणात वाढ झालेली असून कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती बाजार भाव मिळालेला आहे या संदर्भात देखील माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.
सोयाबीनचे बाजार भाव कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाला सोयाबीनचे खरेदी हमीभावाने करण्याची मागणी केलेली आहे. शासनाच्या माध्यमातून दरवर्षी खरीप व रब्बी हंगामातील पिकांची किमान आधारभूत किमतीने खरेदी करण्यात येते. तसेच त्या विशिष्ट पिकासाठी विशिष्ट दर ठरवून देण्यात येत असतो.
सोयाबीनच्या दरात 400 रुपयांची वाढ
शेतकरी मित्रांनो राज्यातील अकोला या महत्त्वाच्या बाजार समितीमध्ये 14 ऑक्टोबर 2023 रोजी सोयाबीनला सरासरी भाव हा 3900 रु इतका होता. त्यानंतर गेल्या सहा दिवसाच्या कालावधीमध्ये हाच दर 3900 रुपयाहून चार हजार तीनशे रुपये पर्यंत पोहोचला आहे.
अनेक शेतकऱ्यांनी आता सोयाबीन काढणी करून विकण्यासाठी सुरुवात केली आहे. त्यामुळे बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक सुद्धा वाढली आहे. गुरुवारी सोयाबीनचा जास्तीत जास्त दर हा ४६०० रुपये व सरासरी दर चार हजार शंभर रुपये इतका होता.
त्यामुळे गेल्या सात ते आठ दिवसाच्या कालखंडात सोयाबीनच्या बाजारभावामध्ये एकूण किमतीचा विचार केल्यास 600 ते 700 रुपयापर्यंत वाढ आपल्याला दिसून येते.
सोयाबीनला मिळत असलेला हा दर अतिशय कमी असून शेतकऱ्यांच्या माध्यमातून शासनाला सोयाबीनची खरेदी शासनाच्या हमीभावाने करण्याची मागणी करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांना यावर्षीचा कापूस हंगाम रडवणार? कापसाच्या उत्पादनात होत आहे मोठी घट