पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंतर्गत देशामध्ये पीएम किसान योजना चालू करण्यात आलेली आहे, देशातील अनेक शेतकरी या योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत. परंतु देशातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजेच पीएम किसान योजनेअंतर्गत मोठ्या संख्येमध्ये शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात आलेले आहे. दिवसेंदिवस पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या घटत चाललेली आहे.
पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र ठरवण्यासाठी काही संबंधित पात्रता योजनेच्या असतात त्या पात्रतेमध्ये शेतकरी बसणे किंवा पात्र ठरणे अत्यंत आवश्यक असते,तरच शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकतो. पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र होण्यासाठी असणाऱ्या अटींमध्ये शेतकऱ्यांना बँक खात्याशी आधार लिंक करणे ई केवायसी करणे तसेच जमिनीच्या मालकीचा पुरावा अशा संबंधित अटी पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत पात्र ठरलेले आहे.
पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना आतापर्यंत संबंधित अटी पूर्ण न केल्याने, शेतकऱ्यांना पात्र यादीतून काढून अपात्र करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रातील 22.40 लाख शेतकरी अपात्र ठरवण्यात आलेले आहे त्यामुळे राज्यातील अपात्र शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेअंतर्गत सहा हजार रुपयांची रक्कम मिळणार नाही.
पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर वार्षिक तीन हप्त्यांमध्ये दोन हजार रुपयांचा एक हप्ता प्रमाणे सहा हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात येत असते परंतु शेतकऱ्यांनी अटींची पूर्तता न केल्याने शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत अपात्र ठरविण्यात आलेले असल्याने अपात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ आता घेता येणार नाही.
शेतकऱ्यांना यावर्षीचा कापूस हंगाम रडवणार? कापसाच्या उत्पादनात होत आहे मोठी घट