शेतकऱ्यांना यावर्षीचा कापूस हंगाम रडवणार? कापसाच्या उत्पादनात होत आहे मोठी घट | Kapus Hangam

यावर्षी राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा खंड पडलेला होता तसेच त्यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व अशा परिस्थितीमध्ये शासना अंतर्गत शेतकऱ्यांना मदत मिळणे अपेक्षित होते. पावसाअभावी कापूस पिके अक्षरशः वाळून चाललेली आहे अशा प्रकारची परिस्थिती सोयगाव तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये वीस दिवसाचा पावसाचा खंड पडून पाऊस गायब झाला. अशा परिस्थितीमध्ये कापूस पिकांची वाढ झालेली नाही, त्यामुळे शेतकरी चिंतित होते.

शेतकऱ्यांना एक प्रकारची आशा परतीच्या पावसाची लागून होती कारण परतीच्या पावसामुळे तरी शेती पिकाला थोडा आधार होईल व शेती पिके सुधारतील अशा प्रकारची अपेक्षा धरून बसलेल्या शेतकऱ्यांच्या अपेक्षेला तडा बसलेला आहे. त्यामुळे कापसाची पिके न वाढलेली व त्या पिकाच्या बोंड्या सुद्धा काळ्या पडू लागलेल्या आहे, सोयगाव तालुक्यातील तब्बल पंधरा हजार पेक्षा जास्त हेक्टर वरील कापूस पिकाची बोंडे काडी पडू लागलेली आहे. तसेच तेथील आनेवारी सुद्धा 48 पैसे दाखवले जात आहे.

सोयगाव तालुक्यावर पडलेले दुष्काळाचे सावट यामुळे शेती पिके तर हातातून वाया गेलेलीच आहे परंतु शेतकऱ्यांना सावरण्याचा एक मार्ग म्हणजे पीक विमा मिळने होय, सोयगाव तालुक्यात पडलेला तब्बल वीस दिवसाचा पावसाचा खंड यामुळे अग्रीम पीक विमा मध्ये सोयगाव तालुक्याला पात्र ठरवणे अपेक्षित होते परंतु पिक विमा कंपनीच्या आक्षेपाणुसार 25% अग्रीम पीकविण्यासाठी तब्बल 21 दिवसाचा पावसाचा खंड पडणे अपेक्षित आहे. परंतु फक्त एका दिवसामुळे सोयगाव तालुका अग्रीम पिक विमा पासून वगळण्यात आलेला आहे व त्यामुळे शेतकऱ्यांना पिक विमा देण्यात यावा अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांकडून वारंवार केली जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या माहितीनुसार तालुक्याला थोड्या प्रमाणात शिथिलता देण्यात येईल असे सुद्धा सांगण्यात आलेले होते.

शेतकऱ्यांना यावर्षीचा कापूस हंगाम रडवणार? कापसाच्या उत्पादनात होत आहे मोठी घट | Kapus Hangam

बायकोच्या नावावर घर घेतल्यास 2 लाख रुपये सुट, ही आहे योजना, संपूर्ण माहिती वाचा