हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील या भागांमध्ये पुन्हा एकदा पावसाची शक्यता | Weather Forecast

हवामान विभागाने दिलेल्या नवीन अंदाजानुसार राज्यातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्यातील सामान्य नागरिकांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने येल्लो अलर्ट जारी केलेला आहे.

राज्यातील काही भागांमध्ये पावसाची स्थिती निर्माण होण्याचे मुख्य कारण म्हणजे अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे, म्हणजेच आद्रता निर्माण झालेली असून कोकण, मध्य महाराष्ट्र मध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मध्य महाराष्ट्र तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता असून राज्यांमध्ये काही भागात ढगाळ वातावरण राहणार आहे, अशा प्रकारचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.

राज्यातील नंदुरबार, धुळे, नाशिक जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने येल्लो आल्यावरती जाहीर केलेला आहे तसेच राज्यातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग मध्ये जोरदार प्रकारच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे राज्यातील सामान्य नागरिकांसाठी व शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.

राज्याच्या विविध भागांमध्ये सोयाबीनची लागवड केली जाते व दिवसात मध्ये सोयाबीनचे पीक काढनीला आली आहे व अशा परिस्थितीमध्ये हवामान विभागाने वर्तवलेला पावसाचा अंदाज शेती पिकांना नुकसानकारक ठरू शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांना ही एक खबरदारी घेणारी बातमी आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील या भागांमध्ये पुन्हा एकदा पावसाची शक्यता | Weather Forecast

शेतकऱ्यांना यावर्षीचा कापूस हंगाम रडवणार? कापसाच्या उत्पादनात होत आहे मोठी घट