यावर्षी राज्यातील विविध भागांमध्ये 20 ते 21 दिवसापेक्षा जास्त काळ पावसाचा खंड पडलेला होता, त्यामुळे पाणी पातळीमध्ये घट होऊन शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत चाललेले होते, शेती पिके पूर्णतः वाया जाण्याच्या मार्गावर होतील अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे अपेक्षित होते त्यामुळे राज्यातील विविध भागांमध्ये पडलेल्या पावसाच्या खंडाने झालेले नुकसान यामधून शेतकऱ्यांना सावरता येणे शक्य होईल.
राज्यातील विविध भागांमध्ये पडलेला पावसाचा खंड यामुळे शेती पिके बाधित झालेली त्याचबरोबरच जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तसेच उत्पादनामध्ये सुद्धा 50% घट होण्याची शक्यता तज्ञांच्या मते वर्तवली जात आहे त्यामुळे मोठ्या अडचणीमध्ये शेतकरी सापडलेला आहे.
शेतकऱ्यांना बाजरी, मका, कापूस, भुईमुंग, मुंग, कांदा या पिकासाठी नुकसान भरपाई दिली जाऊ शकते, तसेच शेतकऱ्यांना साधारणता जास्तीत जास्त साडेआठ ते साडे बावीस हजारापर्यंतची नुकसान भरपाई देण्यात येऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारचा दिलासा मिळेल.
शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम ही दिवाळीपूर्वीच जमा करण्यात येऊ शकते त्यामुळे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, दिवाळी सणानिमित्त रक्कम शेतकऱ्यांना मिळाल्यास शेतकऱ्यांची दिवाळी साजरी करता येईल.
शेतकऱ्यांना कर द्यावा लागतो का? काय आहे नियम? बघा संपूर्ण माहिती