शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजना महाराष्ट्र 2023 अंतर्गत पहिला हप्ता वाटप करण्यात येणार आहे. शेतकरी योजनेचा पहिला हप्ता वाटप करण्यासंदर्भात अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होत्या परंतु योजनेचा पहिला हप्ता वितरण करण्यासाठी वेळ झालेला आहे, नमो शेतकरी योजने संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट प्राप्त झालेली असून आता शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता मिळण्याची तारीख फिक्स झालेली आहे.
राज्य शासनाच्या मार्फत वार्षिक 6000 :-
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धरतीवर महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी योजना सुरू केलेली आहे. आतापर्यंत ज्या शेतकरी बांधवांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत हप्ते मिळत होते अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपयांची मदत मिळत आहे.
या तारखेला नमो नमो शेतकरी योजना चा पहिला हप्ता
आता प्रतीक्षा संपलेली असून नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते गुरुवारी म्हणजेच 26 तारखेला करण्यात येणार आहे. शिर्डी येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला असून त्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान उपस्थित राहणार असून राज्यातील लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपयाची वाटप करतील.
नमो शेतकरी योजनेअंतर्गत अपात्र शेतकऱ्यांची यादी येथे पहा