मनरेगा अंतर्गत विहीर 4 लाख अनुदान अर्ज सुरू, अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस | MNREGA

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजेच मनरेगा अंतर्गत विहीर योजना चालू करण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोबाईल वरून सुद्धा विहीर अनुदान योजनेचा अर्ज भरता येणार आहे. शेतीमध्ये सिंचनाची सुविधा हवीच असते त्यामुळे मनरेगा अंतर्गत विहीर अनुदान साधारणतः चार लाखापर्यंतचे देण्यात येते.

मनरेगा अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस खालील प्रमाणे

  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम प्ले स्टोअर मध्ये प्रवेश करुन Maha egs सर्च केल्यानंतर महा इजियस हर्टीकल्चर वेल ॲप हे सर्वप्रथम इन्स्टॉल करा.
  • ॲप ओपन केल्यानंतर, लाभार्थी लगीन वर क्लिक करा, विहीर अर्ज ऑपशन वर क्लिक केल्यानंतर अर्जदाराच्या संपूर्ण माहितीचा तपशील योग्य प्रकारे भरावा लागेल, त्यामध्ये जॉब कार्ड असणे, गरजेचे आहे.
  • माहिती भरताना लाभार्थ्याची कॅटेगिरी निवडावी लागेल. विहिरीचा भूमापन क्रमांक, संपूर्ण अर्जदार संबंधित व इतर प्रकारची माहिती विचारली जाईल ती संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरा.
  • संपूर्ण माहिती भरल्यानंतर अर्ज सबमिट करा. त्यानंतर संमती पत्र अ, ब दाखवण्यात येईल संपूर्ण माहिती वाचून अर्ज जमा करा या ऑप्शन वर क्लिक करा.
  •  तुम्ही टाकलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येतो तो OTP संबंधित बॉक्समध्ये टाकावा. त्यानंतर अर्ज प्रस्तुत करा या ऑप्शनवर क्लीक करा
  • त्यानंतर ठीक आहे हे ऑप्शन निवडून त्यानंतर तुम्ही तुमच्या आर्जाची स्थिती कुठपर्यंत आलेली आहे, हे अर्जाची स्थिती या ऑप्शन वर क्लिक करून बघू शकता.

मनरेगा अंतर्गत विहीर 4 लाख अनुदान अर्ज सुरू, अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस | MNREGA

नमो शेतकरी योजना १ ला हप्ता तारीख फिक्स, या दिवशी या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2000 रुपये 

विहीर योजना अर्ज कसा करायचा? याचा व्हिडिओ येथे पहा