देशातील विविध भागांमधून बाजारांमध्ये कापूस विक्रीसाठी येणे चालू झालेला आहे, शेतकऱ्यांना पुढील काही दिवसांमध्ये कापसाच्या दराची स्थिती कशी राहणारी याची चिंता भासवत आहे. तसेच बाजारामध्ये सध्याच्या स्थितीत कापूरदारांमध्ये चढउतार होत असताना दिसत आहे, त्यामुळे पुढील काळामध्ये कापसाच्या दरात राहणारी स्थिती कशी असेल अशा प्रकारची मत तज्ञांनी व्यक्त केलेले आहे.
शेतकऱ्यांनी गेल्यावर्षीचा कापूस साठवून ठेवलेला होता परंतु शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला भाव शेवटपर्यंत मिळाला नाही व त्यामुळे यावर्षी कापसाला दर चांगला मिळणार की नाही अशा प्रकारची चिंता शेतकऱ्यांना भासवत आहे, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा कापसाच्या दरामध्ये दबाव दिसून येते.
कापसाच्या दरासाठी विविध प्रकारची कारणे अवलंबून त्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असलेली कापसाची मागणी, कापसाचा असलेला शिल्लक साठा अशा विविध प्रकारच्या गोष्टी कापूस दरात चढउतार होण्यामागे कारणीभूत असतात, तसेच केंद्र शासन अंतर्गत ठरवून दिलेला 2023-24 या आर्थिक वर्षासाठीचा कापूस पिकाचा हमीभाव लांब धागाच्या कापसासाठी 7020 रुपये एवढा आहे.
सध्याच्या स्थितीमध्ये बाजारात कापसाला 7300 रुपये पर्यंतचा दर मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असलेल्या रुईचा कमी दर यामुळे कापसाच्या दरात जास्त सुधारणा होण्याची शक्यता नाकारली जात आहे, त्यामुळे साधारणतः 7500 रुपये पर्यंत कापसाचे दर राहतील अशा प्रकारचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केलेला आहे.
नमो शेतकरी योजना १ ला हप्ता तारीख फिक्स, या दिवशी या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2000 रुपये