अरे बापरे! ऑक्टोंबर महिन्यात बँकांना तब्बल एवढ्या दिवस सुट्ट्या राहणार, सुट्ट्यांचे नेमके कारण आहे तरी काय? | Bank Holiday

सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी, देशामध्ये ऑक्टोबर महिन्यात बँकांना मोठ्या प्रमाणात सुट्ट्या असणार आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना या सुट्ट्या कधी व कोणत्या कारणाने आहे ते माहीत असणे अत्यंत आवश्यक असते, कारण कोणत्या वेळेस कोणत्या प्रकारचे काम पडेल हे कुणालाही सांगता येत नाही, अशा वेळेस बँकांना सुट्टी असणार की नाही हे जर माहीत असेल तर पैशाचे नियोजन नागरिक योग्य प्रकारे करू शकतील.

सप्टेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा चालू झालेला असून ऑक्टोबर महिना काही दिवसातच चालू होईल, व रिझर्व बँक ऑफ इंडिया अंतर्गत देशातील बँकांना ऑक्टोबर महिन्या तब्बल 16 दिवस सुट्टी राहणार आहे अशा प्रकारची माहिती दिली. तसेच बँकांना येणाऱ्या सुट्या राज्यानुसार वेगवेगळ्या असू शकतात.

महाराष्ट्रामध्ये एकूण नऊ दिवस बँकांना सुट्टी असणार आहे, प्रत्येक दिवशी सुट्टी असल्याचे काही ना काही कारण आहे त्यामुळेच बँका बंद असणार, परंतु आज काल संपूर्ण पेमेंट प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने चालते, त्यामुळे अनेक नागरिकांना बँका बंद असल्या तरी सुद्धा कोणत्याही प्रकारची अडचण जाणवणार नाही, परंतु मोठ्या प्रमाणात कॅशची गरज पडल्यास बँकांमध्ये जाण्याची गरज भासते अशा वेळेस नागरिकांना सुट्टी असणारे दिवस माहीत असावे.

महाराष्ट्र मध्ये पुढील दिवशी बँकांना सुट्टी एक ऑक्टोंबर ला रविवार असून या दिवशी सुट्टी असेल, तसेच दोन ऑक्टोबरला गांधी जयंती निमित्त, 8 ऑक्टोंबर रविवार, दुसरा शनिवार निमित्त 14 ऑक्टोंबर ला, 15 ऑक्टोबरला रविवार, तसेच 22 सप्टेंबरला सुद्धा रविवार, 24 ऑक्टोबरला दसरा निमित्त, 28 ऑक्टोंबर चौथा शनिवार, तसेच शेवटची सुट्टी म्हणजे 29 ऑक्टोबरला रविवारी अशाप्रकारे महाराष्ट्रातील बँकांना एकूण नऊ दिवस सुट्टी असणार आहे.

अरे बापरे! ऑक्टोंबर महिन्यात बँकांना तब्बल एवढ्या दिवस सुट्ट्या राहणार, सुट्ट्यांचे नेमके कारण आहे तरी काय? | Bank Holiday

 माहिती महत्वाची, ग्राहकांना पेट्रोल पंपावर या सर्व सुविधा मिळतात मोफत, जाणून घ्या जागरूक व्हा

Leave a Comment