कापूस पिकावर पुन्हा एकदा अस्मानी संकट, लाल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी चिंतेत | cotton crop

कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे नैसर्गिक संकट येऊन पडत आहे व कपाशी पिकावर येणाऱ्या रोगामुळे कापूस उत्पादकतेमध्ये घट होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे, यावर्षी राज्यात मान्सूनचे आगमन उशिरा झालेले असल्याकारणाने, राज्यातील बागायतदार शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केलेली होती व तसेच काही शेतकऱ्यांनी कोरडवाहू लागवड केलेली होती अशा एकंदरीत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

मागील काही दिवसांमध्ये राज्यात मोठ्या प्रमाणात पावसाचा तुटवडा जानवत होता, त्यामुळे अनेक भागांमध्ये पावसाची आवश्यकता भासत होती अशा परिस्थितीमध्ये अनेक शेतकऱ्यांची पिके करपून गेलेली होती, कापूस पिकाची पातेगळ चालू झालेली होती, पाते गळ नंतर आता राज्यामध्ये अचानकच पाऊस जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे, भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस चालू असल्याने शेतकऱ्यांच्या कापूस पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

कापूस पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव जाणवत आहेत त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणी मध्ये पडलेले आहे, कापूस उत्पादक शेतकरी नैसर्गिक संकट व लाल्या रोग या दोन्ही परिस्थितीमध्ये अडकलेला असून कापूस पिकाचे नुकसान होत आहे व कापसाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे. राज्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस चालू असल्याने कापूस पिकाला असलेला माल पूर्णतः गळून पडत आहे. लाल रंगाची फुले तसेच मोठ्या पकलेल्या बोंड्या सुद्धा जमिनीवर पडत आहे.

ज्या शेतकऱ्यांनी पूर्व हंगामी कापसाची लागवड केलेली होती अशा शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस पीक हे काढणीवर आलेले आहे, त्यामुळे पावसामुळे शेतातील काढणीवर आलेला कापूस खराब होत आहे, तसेच कापूस पिकावर पुन्हा एकदा बोंड अळीचे संकट सुद्धा उडवले जाऊ शकते अशा प्रकारची शक्यता वर्तवली जात आहे, आता जरी बोंड  अळी चे प्रमाण कमी असले तरी सुद्धा बोंड अळीचे प्रमाण वाढू शकते, त्यामुळे  कापूस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटामध्ये पडलेला दिसत आहे.

कापूस पिकावर पुन्हा एकदा अस्मानी संकट, लाल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी चिंतेत | cotton crop

फळबाग योजनेच्या खत अनुदानासंबंधी जीआर आला, पहा खताला किती मिळेल अनुदान?