Facilities at petrol pumps : माहिती महत्वाची, ग्राहकांना पेट्रोल पंपावर या सर्व सुविधा मिळतात मोफत, जाणून घ्या जागरूक व्हा

दिवसेदिवस पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होत चाललेली आहे व अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल डिझेलची किंमत परवडणारी नाही परंतु तरीसुद्धा ना इलाजाने नागरिकांना पेट्रोल डिझेलची खरेदी करावी लागते, अशा परिस्थितीमध्ये योग्य सुविधा नागरिकांना मिळायला हव्या या कारणाने नियम पाडलेले असतात, परंतु हल्ली या नियमांचे पालन कोणीही करताना दिसत नाही.

पेट्रोल पंपावर असलेल्या असुविधामुळे छत्रपती संभाजी नगर येथे एका पेट्रोलियममार्फत गरजू लोकांना पेट्रोल डिझेलचा पुरवठा करण्यात येतो परंतु इतर प्रकारची कोणतीही सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध नसल्याकारणाने नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचा आरोप संदीप देशमुख यांनी नितीन गडकरी केंद्र मंत्री यांच्याकडे केलेला आहे.

 

पेट्रोल पंपावर अपेक्षित असलेल्या सुविधा

पेट्रोल पंपावर पाण्याची सुविधा अपेक्षित असते, परंतु कोणत्याही ठिकाणी पाण्याची सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध केलेली नसते, अशा परिस्थितीमध्ये पेट्रोल पंप चालकाने सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्या, एखाद्या वेळेस आपातकालीन परिस्थिती निर्माण झाली व अशा वेळेस फोनची सुविधा मोफत उपलब्ध असायला हवी.

पेट्रोल पंपापर अग्निशामकाची उपकरणे उपलब्ध असावी तसेच शौचालयाच्या सुविधा सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध असायला हव्या, परंतु अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध नसतात, सुविधा उपलब्ध करून देणे हे अटींमध्ये आहे, तसेच मोफत हवा भरण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध असावी, अशा प्रकारच्या संपूर्ण सुविधा पेट्रोल पंपावर उपलब्ध असाव्या परंतु कोणत्याही पेट्रोल पंपावर अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध नसताना अशा परिस्थितीत पेट्रोल पंपाधारकांनी अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या.

Facilities at petrol pumps : माहिती महत्वाची, ग्राहकांना पेट्रोल पंपावर या सर्व सुविधा मिळतात मोफत, जाणून घ्या जागरूक व्हा

बियर बार ओपन करण्यासाठी, लागणारा परवाना कुठे काढतात तसेच त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती बघा संपूर्ण माहिती