Rain condition : राज्यातीत सप्टेंबर,ऑक्टोंबर महिन्यात पावसाची स्थिती काय राहील? हवामान विभागाचा नवीन अंदाज

राज्यातील शेतकरी चिंतीत झालेले आहे, कारण यंदा पावसाची स्थिती बघता शेतातील पिकांची परिस्थिती अत्यंत नाजूक झालेली आहे, पावसाचे झालेले उशिराचे आगमन, व मध्येच पडलेला पावसाचा खंड यामुळे दुष्काळ पडतो की काय? अशा प्रकारची संभावना व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पंजाब डख यांनी दिलेला अंदाज शेतकऱ्यांची चिंता मिटवणारा असू शकतो.

राज्यामध्ये सरासरीपेक्षा खूप कमी प्रमाणात पाऊस झालेला आहे तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण खूप कमी असल्याने त्या भागात दुष्काळ पडण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहे, असाच एक आशेचा किरण म्हणजेच पंजाब डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार, सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस चांगला पडू शकतो.

पंजाब डख यांच्या अंदाजानुसार जर सप्टेंबर,ऑक्टोबर महिन्यामध्ये चांगला पाऊस झाला तर राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागणार नाही, त्यामुळे करपलेल्या शेती पिकांना एक नवीन जीवनदान मिळू शकेल. त्यामुळे सप्टेंबर महिन्यातील पाऊस शेती पिकाला महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

ऑगस्ट महिना पूर्णतहा कोरडा गेलेला आहे, तसेच शेवटच्या आठवड्यामध्ये काही भागात हलक्या स्वरूपाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवलेली आहे, तसेच सप्टेंबर महिन्याच्या सात तारखेपर्यंत सरासरी पेक्षा कमी पाऊस पडणार असा अंदाज सांगण्यात आलेला असला तरी, पंजाब डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे जर अंदाज खरा निघाला तर मात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो.

Rain condition : राज्यातीत सप्टेंबर,ऑक्टोंबर महिन्यात पावसाची स्थिती काय राहील? हवामान विभागाचा नवीन अंदाज

कापसातील बोंड आळी वर नियंत्रण मिळवण्यासाठी, एक महत्त्वपूर्ण सल्ला, कापूस उत्पादनात मोठ्या प्रमाणात होईल वाढ