Constant rain : राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर, 3 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 210 कोटी 36 लाख अनुदान

राज्यामध्ये सन 2022 मध्ये सततच्या पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते, व या कारणाने राज्य शासना अंतर्गत सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्यात आलेला होता, व त्यामुळे राज्यातील 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला होता.

राज्यातील 14 जिल्ह्यातील एकूण 26 लाख 50 हजार 951 शेतकऱ्यांसाठी सततच्या पावसाच्या अनुदान म्हणून 1500 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा करण्यात आलेली होती, व निधी वितरणाची प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आलेली होती.

अनुदानाचे वितरण करत असताना पहिल्या व दुसऱ्या टप्प्यामध्ये, अनेक शेतकऱ्यांची केवायसी करून अनुदानाचे वितरण सुद्धा करण्यात आलेले होते तसेच, तिसऱ्या टप्प्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी केवायसी केली,परंतु शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण केले गेलेले नव्हते, त्यामुळे अनुदानापासून वंचित असलेले शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये होते.

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या अंतर्गत राज्यातील अनुदानापासून वंचित असलेल्या 3 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी अंतर्गत, अनुदान वितरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाचे वितरण केले जाईल.

राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर, साधारणपणे 210 कोटी 36 लाख रुपयाची रक्कम वर्ग करण्यात येणार आहे, अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी नगर, बीड, बुलढाणा, जळगाव, जालना, नागपूर, नाशिक,धाराशिव, सोलापूर, वाशिम,परभणी या एकूण 14 जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच अनुदानाचे वितरण करण्यात येणार आहे.

Constant rain : राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर, 3 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 210 कोटी 36 लाख अनुदान

 राज्यातीत सप्टेंबर,ऑक्टोंबर महिन्यात पावसाची स्थिती काय राहील? हवामान विभागाचा नवीन अंदाज