आता प्रत्येक ठिकाणी Online पद्धतीने प्रक्रिया पार पाडल्या जात असतात, कोणत्याही ठिकाणी जायचे झाल्यास ऑनलाईन पद्धत ही चुकतच नाही, व त्यामधील लाईट बिल सुद्धा आलेले आहे, अनेक ठिकाणी आपण गुगल पे किंवा इतर पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करतो, अनेक ऑनलाईन पद्धतीने सुविधा मोबाईलवर उपलब्ध झालेल्या आहेत. साधी दहा रुपयाची वस्तू जरी विकत घ्यायची झाली तर दुकानदार मात्र ऑनलाइन पद्धतीने पेमेंट करा असे म्हणतो व आपण सुद्धा मोबाईल वरून एका मिनिटांमध्ये ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करतो, व अशीच सुविधा तुम्हाला लाईट बिल भरण्याबाबत सुद्धा आहे. तुम्हाला तुमच्याच मोबाईल वरून पाच मिनिटांमध्ये स्टेप बाय स्टेप फॉलो करून लाईट बिल भरता येणार आहे.
लाईट बिल भरण्याची सुविधा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध झालेली आहे. सध्याच्या धावत्या जीवनामध्ये वेळेला खूप महत्त्व प्राप्त झालेली असल्यामुळे तसेच नागरिकांना वेळेची मुबलकता नसल्याने वेळ पुरत नाही व याच कारणाने लाईट बिल भरण्यासाठी प्रत्यक्ष जाऊन लाईट बिल भरणे, याबाबत नागरिक टाळाटाळ करतात. परंतु नागरिकांना आता प्रत्यक्ष जाऊन लाईट बिल भरण्याची कोणतीही गरज नाही, कारण नागरिकांच्या सुविधांसाठी ऑनलाईन पद्धतीने लाईट बिल भरणे आता शक्य झालेले आहे. व त्यामुळे तुम्ही घर बसल्या दोन मिनिटांमध्ये कोणतेही काम करत असताना लाईट बिल भरू शकता व त्यामध्ये वेळेची व श्रमाची बचत होते.
ऑनलाइन पद्धतीने विज बिल भरण्याची संपूर्ण प्रोसेस
लाईट बिल भरताना खालील दिलेली संपूर्ण प्रोसेसर फॉलो केली तर नागरिक सहजरीत्या लाईट बिल दोन मिनिटांमध्ये भरू शकतात.ऑनलाइन पद्धतीने भरण्याकरिता सर्वप्रथम नागरिकांनी गुगल पे ओपन करा. गुगल पे ओपन केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला विविध प्रकारचे ऑप्शन दाखवण्यात येईल त्यामध्ये इलेक्ट्रिसिटी बोर्ड या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्ही महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करा. त्यानंतर तुमच्यासमोर कंजूमर ऑप्शन दिसेल त्यामध्ये तुम्हाला कंजूमर नंबर टाकायचा आहे तो नंबर टाका. Proceed अशी ऑप्शन पुढे येईल त्या ऑप्शन वर क्लिक करा. वर तुम्हाला जेवढे इलेक्ट्रिसिटी बिल आलेले असेल ते इलेक्ट्रिसिटी बिल ची किंमत टाका, व जेवढे बिलाची किंमत असेल तेवढे पैसे पेमेंट करा. अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या दोन मिनिटांमध्ये इलेक्ट्रिसिटी बिल भरू शकणार आहात.
कृषी केंद्र सुरू करण्यासाठी परवाना कसा काढायचा? कृषी सेवा केंद्र लायसन्स प्रक्रिया