राज्यातील अनेक भागांमध्ये कापसाची लागवड खूप मोठ्या प्रमाणात केली जाते, परंतु दिवसान दिवस कापसाच्या उत्पादनामध्ये घट होत असताना दिसत आहे, कारण कापसाच्या पिकावर वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव पडलेला आहे, परंतु कापसाच्या उत्पादनामध्ये घट होण्याचे मुख्य कारण म्हणजे गुलाबी बोंड अळी आहे, अनेक भागांमध्ये गुलाबी बोंड अळी अटॅक करते, त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये खूप मोठ्या घट होत चाललेली आहे.
गुलाबी बोंड आळी वर शेतकऱ्यांनी घरबसल्या उपाय कोणता करावा? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला असेल. शेतकऱ्यांनी घरगुती उपाय सुद्धा गुलाबी बोंड आळी हटवण्यासाठी करायला हवा.राज्यातील मराठवाडा व विदर्भामध्ये पिकांवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात पाहायला दिसत आहे. त्यामुळे गुलाबी बोंड अळीवर नियंत्रण मिळवणे अत्यंत आवश्यक झालेले आहे.
कापूस पिक म्हटले तर खूप मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो, परंतु मध्ये आलेल्या गुलाबी बोंड अळीच्या अडथळ्यामुळे शेतकरी चांगले उत्पादन मिळवू शकत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस कापसाची उत्पादकता कमी होत चाललेली आहे. पावसाच्या उत्पादनामध्ये वाढ व्हावी याकरिता गुलाबी बोंडळी वर नियंत्रण मिळवणे गरजेचे झालेले आहे.
शेतकऱ्यांनी गुलाबी बोंडळी वर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतामध्ये गुलाबी बोंड अळीची पतंगे असतात, त्या पतंगाचा प्रादुर्भाव जर नियंत्रणात आणला गेला तर बोंडळीचा प्रादुर्भाव निश्चितच कमी होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी तेलाचा डब्बा घ्यावा त्यामध्ये पिवळा रंग लावा,त्या डब्यामध्ये एक लाईट लावा म्हणजेच लाईटच्या प्रकाशाने तो डबा गरम होईल व उजेडाकडे आलेले पतंग त्या गरम डब्याला लागून मरण पावले. त्यामुळे गुलाबी गोळीचा प्रादुर्भाव शेतामध्ये कमी जाणवू लागेल. अशाप्रकारे शेतकऱ्यांनी गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव होण्यापासून बचाव केला जाऊ शकतो.