सोयाबीन पिकावर वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव आढळत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेवरच या कीटकांचा प्रादुर्भाव रोखणे आवश्यक आहे कारण, जर शेतकऱ्यांनी वेळेवर कीटकांच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवले नाही तर शेतकऱ्यांच्या सोयाबीन उत्पादनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घट पडण्याची शक्यता आहे, आताच्या दिवसांमध्ये सोयाबीन पिकावर जास्तीत जास्त आढळणारा रोग म्हणजेच पिवळा मोझॅक रोग आहे.
शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकावर हा रोग आहे की नाही हे कसे ओळखावे, हा प्रश्न पडलेला असेल तर शेतकऱ्यांनो सोयाबीनच्या पानावर जर विखुरलेल्या अवस्थेमध्ये पिवळ्या रंगाचे चट्टे दिसत असेल किंवा गंजलेले तांबूस रंगाची चट्टे दिसत असेल तर तुमच्या सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक रोग आहे. यावर उपाययोजना सुद्धा शेतकऱ्यांनी वेळेवर करणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकावर रोग आढळल्यास शेतकऱ्यांच्या सोयाबीन उत्पादनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घट होते, कारण सोयाबीन पिकावर हा रोग वाढतच गेल्यास कालांतराने ज्यावेळेस पिकाला शेंगा लागतात त्यावेळेस शेंगाचे प्रमाण कमी व अनेक शेंगा फक्त चपक्या असतात म्हणजे त्यामध्ये सोयाबीनचे दाणे जास्त प्रमाणात आढळत नाही. तसेच दाण्यांचा आकार सुद्धा लहान असतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेवर सावध होऊन सोयाबीन पिकावरील रोग नियंत्रण करायला हवे.
सोयाबीन पिकावरील रोगावर नियंत्रण अशा पद्धतीने मिळवता येईल
पिवळा मोझॅक हा रोग पांढरी माशी जास्तीत जास्त प्रमाणात पसरवते त्यामुळे पांढऱ्या माशीचे नियंत्रण करावे, त्यासाठी शेतकऱ्यांनी औषधांची फवारणी करायला हवी.असिटामिप्रीड 25% व बाइफेन्थ्रीन 25 टक्के डब्ल्यूजी शंभर ग्रॅम त्यांची फवारणी करायला हवी. तसेच शेतीमध्ये नत्र युक्त खतांचा अति वापर करू नये. जर शेतकऱ्यांना फवारणी केल्यानंतर सुद्धा पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव आढळला तर शेतकऱ्यांनी दहा ते बारा दिवसानंतर दुसरी कीटकनाशकांची फवारणी करायला हवी. शक्यतो शेतकऱ्यांनी बिगर हंगामी सोयाबीनची लागवड करू नये, अशा प्रकारे शेतकऱ्यांनी वेळेवर रोगावर नियंत्रण मिळवावे.
खुशखबर, कांदा अनुदान आले! शासन निर्णय जारी, या शेतकऱ्यांना मिळेल इतके अनुदान