Kanda Anudan: खुशखबर, कांदा अनुदान आले! शासन निर्णय जारी, या शेतकऱ्यांना मिळेल इतके अनुदान

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कांदा अनुदानासाठी प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना आता कांदा अनुदान वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. लेट खरीप कांद्याची विक्री खूप कमी दरामध्ये करण्यात आलेली होती, त्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 350 रुपये प्रती शेतकरी 200 क्विंटल पर्यंत अनुदानाचे वितरण करण्यास मंजुरी देण्यात आलेली होती अनेक शेतकऱ्यांन मार्फत अर्ज केले गेलेले होते.

पात्र शेतकऱ्यांसाठी एकूण 883 कोटी रुपयांची गरज लागलेली असताना राज्य शासना अंतर्गत, 550 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली होती व 18 ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या जीआर नुसार,465 कोटी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान, तर दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 54 टक्के अनुदान पहिल्या टप्प्यात वितरित करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांनी 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्ये, खरीप हंगामाच्या लाल कांद्याची विक्री खाजगी बाजार समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, थेट पणन अनुज्ञप्तीधारकाकडे अथवा नाफेड कडे विक्री केली असल्यास प्रति क्विंटल 350 रुपये प्रति शेतकरी जास्तीत जास्त दोनशे क्विंटल पर्यंत अनुदान जाहीर करण्यात आलेले आहे.

या 13 जिल्ह्याला 100% अनुदानाची वितरण

 

शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या खात्यावर डीबिटी द्वारा अनुदानाचे वितरण करण्यात येणार आहे व अनुदान पुढील आठ दिवसांमध्ये वितरित केल्या जाण्याची शक्यता आहे, 10 कोटी पेक्षा कमी अनुदानाची मागणी असलेल्या 13 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना संपूर्ण अनुदानाची रक्कम वितरित करण्यात येणार आहे. त्यामध्ये नागपूर, रायगड,सातारा, सांगली,यवतमाळ ,ठाणे, बुलढाणा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, लातूर, अकोला, वाशिम या 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण रक्कम वितरित करण्यात येणार आहे.

 

या 10 जिल्ह्याला 54% अनुदानाचे वितरण

 

10 कोटी पेक्षा जास्त अनुदानाची मागणी असलेल्या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 54 टक्के अनुदानाचे वितरण पहिल्या टप्प्यात करण्यात येणार आहे. उर्वरित 46 टक्के रक्कम दुसऱ्या टप्प्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे. त्यामध्ये नाशिक, धाराशिव, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर,बीड या एकूण दहा जिल्ह्यांना 54 टक्के अनुदानाचे वितरण पहिल्या टप्प्यात करण्यात येणार आहे.

 

या 13 जिल्ह्यानुसार वितरित होणारा निधी

 

1. नागपूर – 4 कोटी 44 लाख

3. रायगड – 68 कोटी 16 लाख

4. सांगली – 7 कोटी 99 लाख

5. सातारा – 3 कोटी 3 लाख

6. ठाणे – 1 कोटी 46 लाख

7. अमरावती – 65 हजार 99

8. बुलढाणा – 33 लाख 92 हजार

9. चंद्रपूर – 2 कोटी 27 लाख

10. वर्धा – 5 लाख 84 हजार

11. लातूर – 1 कोटी 13 लाख

12. यवतमाळ – 5 लाख 63 हजार

13. अकोला – 95 लाख 63 हजार

14. वाशिम – 16 लाख 17 हजार

 

या 10 जिल्ह्यानुसार वितरित होणारा निधी

 

1. नाशिक – 234 कोटी 96 लाख

2. धाराशिव – 13 कोटी 34 लाख

3. पुणे – 36 कोटी 8 लाख

4. सोलापूर – 54 कोटी 57 लाख

5. अहमदनगर – 55 कोटी 44 लाख

6. छत्रपती संभाजी नगर – 11 कोटी 24 लाख

7. धुळे – 6 कोटी 81 लाख

8. जळगाव – 12 कोटी 49 लाख

9. कोल्हापूर – 7 कोटी 24 लाख

10. बीड – 12 कोटी 15 लाख

Leave a Comment