महाराष्ट्र मध्ये सोयाबीनचे उत्पादन चांगल्या प्रकारे घेतल्या जाते, परंतु यावर्षी मान्सून उशिरा दाखल झाल्याने सोयाबीनच्या तसेच इतर पिकांच्या सुद्धा उत्पन्नामध्ये घट होण्याची शक्यता टाळता येणार नाही, व या कारणाने सोयाबीनची लागवड केल्यानंतर सोयाबीनची योग्य निघाला कोण सोयाबीनला योग्य वेळी योग्य औषधांची फवारणी होणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर काही भागांमध्ये आत्तापर्यंत सुद्धा पेरण्या पूर्ण झालेल्या नसल्याने शेतकऱ्यांवर एक मोठी संकट येऊन पडलेले आहे,
काही भागांमध्ये सोयाबीनच्या पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत, सोयाबीन ची जात कमी पाण्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणात उगवण क्षमता असणारी जात असल्याने कमी पाण्यामध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीन केलेले आहे, व अनेक ठिकाणी पाऊस पोचलेला आहे, व अशाच शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पिकावर पहिली फवारणी किती दिवसांनी करावी हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला असेल.
कोणत्याही पिकाचे भरघोस प्रमाणात उत्पन्न काढण्यासाठी त्या पिकाची योग्य निगा राखावी लागते. व त्यामुळे सोयाबीन वर योग्य औषधाची फवारणी होणे आवश्यक आहे, शेतकऱ्यांनी पहिली फवारणी कीटकांच्या नियंत्रणासाठी मारायला हवी. त्याचबरोबर एक महिना सोयाबीनचे पेरणीनंतर महत्त्वाचा असल्याने त्यादरम्यान कीटकांचा प्रादुर्भाव जाणवतो व त्यात दरम्यान शेतकऱ्यांनी पहिली फवारणी करायला हवी.
फवारणी मध्ये कीटकांचा प्रादुर्भाव करण्यासाठी योग्य औषधाची फवारणी करणे अत्यंत आवश्यक असल्यामुळे सोयाबीनच्या पिकावर क्लोरोपायरीफॉस त्याचबरोबर सायपरमेथ्रीन यांची फवारणी करावी त्याचबरोबर सिजेन्ता चे अलीका व इमामेक्टिन बेन्झोईट अशा औषधांची फवारणी करायला हवी, त्याचप्रमाणे या औषधांची काम तज्ञांच्या माहितीनुसार तसेच योग्य प्रकारे निवडायला हवे, अशाप्रकारे कीटकांचा प्रादुर्भाव करण्यासाठी पहिली फवारणी शेतकऱ्यांनी वरील औषधांची करायला हवी.
टीप: शेतकरी बांधवांनी पिकांमध्ये फवारणी करण्यापूर्वी तज्ञांचा किंवा कृषी सेवा केंद्र यांचा सल्ला अवश्य घ्यावा.