खरीप हंगाम 2023 ची ई पिक पाहणी सुरू, अशी करा ई पिक पाहणी मोबाईल वरून, पिक विमा करिता आवश्यक | E Pik Pahani

शेतकरी बांधवांना आता आपल्या महाराष्ट्र राज्य मध्ये जर सातबारावर पिकांची नोंद करायची असेल तर त्याकरिता ऑनलाइन पद्धतीने पीक पाहणी करावी लागते. पूर्वी जर आपल्याला सातबारावर पिकांची नोंद करायची असेल तर त्याकरिता तलाठी यांच्याकडे जाऊन सातबारावर पिकाची नोंद करता येत होती परंतु आता राज्यामध्ये मागील 2 वर्षांपासून ई पिक पाहणी पद्धत सुरू झालेली असून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकांची नोंद स्वतः Pik Pahani ने करायची आहे.

 

खरीप हंगाम 2023 पिक पाहणी सुरू Kharip E Pik Pahani 2023:

सध्या राज्यामध्ये पावसाचे आगमन झालेले असून शेतकरी मोठ्या प्रमाणात पेरण्या करत आहे. राज्यातील अनेक भागात पेरण्या आटोपलेल्या असून ज्या ठिकाणी पाऊस उशिराने पोहोचला त्या ठिकाणी सध्या पेरण्या सुरू आहे. आणि आता राज्यामध्ये E Pik Pahani प्रक्रिया सुरू झालेली असून शेतकऱ्यांना त्यांनी शेतामध्ये पेरलेल्या पिकांची नोंद सातबारावर ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.

 

खरीप हंगाम २०२३ ची ई पिक पाहणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तलाठी कार्यालयात जाण्याची आवश्यकता नसून ही पिक पाहण्याची नवीन अपडेट असणारे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करा. त्यानंतर अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही ई पिक पाहणी करू शकतात. यापूर्वीच्या पोस्टमध्ये देखील आपण मोबाईलच्या साह्याने e pik pahani कशी करायची या संदर्भात माहिती जाणून घेतलेली आहे.

 

शेतकऱ्यांची ई पिक पाहणी करण्यासाठी सुरुवात:

राज्याच्या ज्या भागात पेरणी आटोपलेल्या आहे, त्या भागातील शेतकरी ई पिक पाहण्याची प्रक्रिया सुरू झालेली असल्यामुळे आता ई पीक पाहणी करत आहेत. राज्यामध्ये जवळपास दोन वर्षापासून म्हणजेच 2021 पासून ई पीक पाहणी सुरू आहे. राज्यामध्ये पीक पाहणीचा सर्वात महत्त्वाचा प्रकल्प राबवण्यात येत असून खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांची नोंदी शेतकरी स्वतः या ई पिक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून घेऊ शकतात.

 

मोबाईल वरून ई पिक पाहणी कशी करायची? याची माहिती येथे पहा

 

ज्या भागात इंटरनेट च्या सुविधा नाही, किंवा त्या भागातील नागरिक साक्षर नसतील तर अशा परिस्थितीमध्ये जर शेतकऱ्यांनी पीक पाहणी प्रक्रिया केली नाही तर पिक पाहण्याची तारीख संपल्यानंतर 30 दिवसापर्यंत त्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी त्या गावातील तलाठी यांना करता येते.

 

मोबाईल वरून ई पिक पाहणी कशी करायची? याची माहिती येथे पहा

 

राज्य शासनाने हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुरू केलेला असून कोणताही शेतकरी पिक पाहणी पासून वंचित राहू नये यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.