Shetkari Yojana: खुशखर, आता सर्व शेतकरी योजनांचे अर्ज करा मोबाईल ॲप वरून, नवीन ॲप लॉन्च

शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी पुढे आलेली आहे महाडीबीटी वर शेतकऱ्यांसाठी संपूर्ण प्रकारच्या योजना राबविण्यात येत असतात व शेतकऱ्यांना या योजने अंतर्गत जेव्हा लाभ मिळतो त्यावेळेस किंवा जेव्हा शेतकरी महाडीबीटी अंतर्गत योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करतात त्यावेळेस अर्जाची कुठपर्यंत आहे त्याप्रमाणे जेव्हा लॉटरीमध्ये शेतकऱ्यांची नाव लागते अशा वेळेस त्यांना जी महत्वाची कागदपत्रे अपलोड करावी लागतात त्याची संपूर्ण सुविधा मोबाईल वर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या योग्य सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे, त्यामध्ये ज्यावेळेस शेतकऱ्यांना महाडीबीटी अंतर्गत कोणत्याही योजनेचा लाभ घेताना लॉटरी मध्ये नाव येते अशा वेळेस सीएससी सेंटर किंवा आपले सरकार केंद्र या ठिकाणी न जाता संपूर्ण सुविधा शेतकऱ्यांना सुलभ व्हाव्या या कारणामुळे मोबाईलवर उपलब्ध करून दिलेले आहे.

शहरांमध्येच नाही तर संपूर्ण खेड्यामध्ये सुद्धा जागोजागी मोबाईलचा वापर वाढत चाललेला आहे व अशा वेळेस शेतकऱ्यांना महाडीबीटी अंतर्गत योजनेचा लाभ घेताना कोणत्याही प्रकारची अडचण येता कामा नये, या कारणाने महाडीबीटी अंतर्गत लागू करण्यात येणाऱ्या योजनेची संपूर्ण कर्जाची स्थिती असो किंवा कागदपत्रे असो अशा प्रकारची सुविधा मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

शेतकऱ्यांसाठी मोबाईलवर एक ॲप सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्या ॲपवरून महाडीबीटी अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या संपूर्ण विनंती सुविधा त्यामध्ये उपलब्ध असणार आहे त्याचप्रमाणे ज्या वेळेस सगळ्यांना लॉटरी लागते असे वेळेस अपलोड करावयाची कागदपत्रे त्याचबरोबर अर्जाची स्थिती यामध्ये चेक करता येणार आहे. त्याचप्रमाणे देणारे हे ॲप कोणता आहे व त्यानंतर शेतकऱ्यांना कशाप्रकारे सुविधा उपलब्ध होणार आहे एप्लीकेशन कसे डाउनलोड करायचे याबद्दल आपण संपूर्ण माहिती या लेखांमध्ये बघूया.

 

अशा प्रकारे मोबाईल मध्ये ॲप डाऊनलोड करा

शेतकऱ्यांना महाडीबीटी राबविण्यात येणाऱ्या योजना बद्दल तसेच वर्गाची स्थिती व कागदपत्रे याबद्दल संपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे व तो ॲप मोबाईल मध्ये कसा डाऊनलोड करायचा व कशाप्रकारे त्यामधून शेतकऱ्यांना लाभ घेता येईल.

मोबाईल मध्ये ॲप डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम प्ले स्टोअर मध्ये जावे, महाडीबीटी शेतकरी मोबाईल मध्ये डाउनलोड करण्यासाठी, MahaDBT Farmer असे सर्च करा.

त्यानंतर महाडीबीटी फार्मर हे एप्लीकेशन तुम्ही मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा. तुम्ही ॲप मध्ये गेल्यानंतर Allow या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर लॉगिन करा.

जर तुमची महाडीबीटी अंतर्गत योजनेमध्ये नाव आलेले असेल तर तुम्हाला कागदपत्रे अपलोड करावी लागतात व ती कागदपत्रे कसे अपलोड करायची हे आपण बघूया.

Maha dbt शेतकरी योजनांचे ॲप ची लिंक 

 

कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध

ॲप मध्ये गेल्यानंतर कागदपत्रे अपलोड करा या ऑप्शन वर क्लिक करा, त्यामध्ये सातबारा, आठ अ कोटेशन जी कागदपत्रे मागितली जगातील कागदपत्रे तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकता.

कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला बिल किंवा देय असे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून आपण कागदपत्रे अपलोड केलेली आहे त्याचप्रमाणे त्यानंतर दिलेले ऑप्शन म्हणजे मी अर्ज केलेल्या बाबी.

1. मंजूर अर्ज

त्यामध्ये पहिली ऑप्शन तुम्हाला दिसेल मंजूर केलेले अर्ज या मंजूर केलेल्या अर्जामध्ये जेव्हा तुम्ही फॉर्म भरता व ज्या वेळेस तुमच्या बँक खात्यामध्ये अनुदानित करण्याची ते त्याची माहिती मंजूर अर्ज यामध्ये देण्यात येते.

2. देयक प्रलंबित

ज्यावेळेस शेतकरी अर्ज करतात त्यावेळेस जर तुमचा अर्ज पेंडिंग असेल तर त्या आजची स्थिती देयक प्रलंबित अर्जामध्ये दाखवण्यात येते.

3. नाकारलेले अर्ज

तिसरे ऑप्शन तुम्हाला नाकारलेला अर्ज असे दिसेल जर तुमचा काही कारणांनी अर्ज नाकारण्यात येईल त्यावेळेस नाकारलेल्या अर्जामध्ये अर्ज दिसेल.

4. छाननी अंतर्गत अर्ज

छाननी अंतर्गत कर्जामध्ये तुमच्या अर्जाची स्थिती तुम्हाला दिसेल म्हणजेच यामध्ये जर तुमचा अर्ज दिसला तर मात्र तुम्हाला लॉटरी लागण्याची शक्यता आहे असे समजले जाते. व ज्या वेळेस तुमची लॉटरी लागेल त्यावेळेस तुम्हाला मोबाईल द्वारा कळवण्यात येईल. जेव्हा तुम्हाला लॉटरी लागेल त्यावेळेस विनर हे ऑप्शन तिथे दिसेल म्हणजे समजून जायचं की तुम्हाला लॉटरी लागलेली आहे.

One Nation One Ration: माहिती महत्वाची, आता देशात कोणत्याही रेशन दुकानातून घेता येणार रेशन, राज्यात ही योजना सुरू

अशाप्रकारे शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना त्यातील अपलोड करावयाची कागदपत्रे व अर्जाची स्थिती संपूर्ण माहिती या महाडीबीटी फार्मर एप्लीकेशन वरून शेतकरी सहजरित्या बघू शकणार आहेत.

Farmers Scheme 2023: केंद्र शासनाच्या या योजने अंतर्गत 3.70 लाख कोटी निधी मंजूर, शेतकऱ्यांना होईल मोठा फायदा

Leave a Comment