One Nation One Ration: माहिती महत्वाची, आता देशात कोणत्याही रेशन दुकानातून घेता येणार रेशन, राज्यात ही योजना सुरू

रेशन कार्ड धारक व्यक्तींसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी पुढे आलेली आहे, ज्या नागरिकांकडे Ration Card आहे अश्या नागरिकांसाठी एक अत्यंत आनंदाची व महत्त्वपूर्ण बातमी आलेली आहे, याबद्दल या लेखात आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत, शासनांतर्गत एक निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे आणि तो निर्णय रेशन धारक नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व फायदेशीर ठरणार आहे. त्याचप्रमाणे देशातील संपूर्ण नागरिकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.

 

केंद्र सरकार तर्फे 2019 ला केंद्रीय खाद्य व सार्वजनिक वितरण विभागातर्फे एक देश एक रेशन कार्ड योजना सुरू करण्यात आलेली होती, या योजनेबाबतच एक महत्त्वपूर्ण अपडेट 4 जुलै 2023 ला पुढे आलेली आहे. देशामध्ये एक देश एक रेशन कार्ड योजना चालू करण्यात आलेली असली तरी मात्र या योजनेची अंमलबजावणी होत नव्हती, कारण राज्य शासनाने अशा प्रकारच्या सूचना जारी केलेल्या नव्हत्या व त्यामुळे नागरिकांना एक देश एक रेशन कार्ड या योजनेचा लाभ घेता येत नसल्याने अडचणी निर्माण होत होत्या.

 

काय होते योजनेचे स्वरूप:

एक देश एक रेशन कार्ड योजना अंतर्गत देशातील नागरिकांना कोणत्याही स्वस्त धान्य दुकानांमध्ये जाऊन आपल्या आधार कार्ड दाखवून रेशन धान्य घेता येत होते, व अशा प्रकारच्या सुविधा नागरिकांना पर्यंत पोहोचावे याकरिता निर्णय घेण्यात आलेला होता परंतु राज्य सरकार अंतर्गत आतापर्यंत मात्र या योजनेच्या अंमलबजावणीच्या सूचना जारी केलेल्या नसल्याने राज्यामध्ये या योजनेचा लाभ नागरिकांना घेता येत नव्हता. व या योजनेचा मुख्य फायदा म्हणजे जे नागरिक स्थलांतरित होतात कामाकरिता एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातात त्याचप्रमाणे जे मजूर कामगार लोक असेल अशा नागरिकांना एक देश एक रेशन कार्ड योजनेअंतर्गत चांगल्या प्रकारे फायदा मिळू शकतो व यामुळे राज्य शासना अंतर्गत सुद्धा एक निर्णय घेण्यात आलेला आहे.

 

योजने संदर्भात शासनाचे नवीन परिपत्रक जारी:

राज्य शासना अंतर्गत आतापर्यंत एक देश एक रेशन कार्ड योजना राज्यामध्ये चालू करण्यासाठी परिपत्रक निघालेले नव्हते असे वारंवार सांगण्यात येत असली तरी मात्र योजनेसाठी आता अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागा अंतर्गत 4 जुलै 2023 ला परिपत्रक काढण्यात आलेले आहे व त्याचप्रमाणे आदेश देण्यात आलेली आहे की या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी.

Ration Home Delivery: शिंदे सरकारचा मोठा निर्णय, आता रेशन धान्य मिळणार घरपोच, रेशन आपल्या दारी योजना!

व त्यामुळे आता देशातील नागरिकांना एक देश एक रेशन कार्ड योजने अंतर्गत कोणत्याही स्वस्त रेशन दुकानांमध्ये आधार कार्ड दाखवून रेशन उचलता येणे शक्य होणार आहे, व या सर्व निर्णयांमध्ये सर्वात जास्त फायदा हा स्थलांतरित मजुराचा होणार आहे. व त्यामुळे ही रेशन कार्ड धारक नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती.

Nuksan Bharpai Update: या जिल्ह्यातील या वगळलेल्या महसूल मंडळांना नुकसान भरपाई मंजूर, आता मिळेल 24 कोटी 51 लाख भरपाई