आपल्या राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नवीन सरकारने राज्यातील जनतेसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहे, त्यापैकी काही निर्णयाची अंमलबजावणी व्हायची आहे तर अनेक निर्णयाची अंमलबजावणी देखील सुरू झालेली आहे. आता शिंदे सरकारने रेशन कार्ड च्या माध्यमातून धान्याचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यासाठी नवीन निर्णय घेतलेला आहे. आता रेशन कार्ड धारकांना घरपोच रेशन Ration Home Delivery मिळणार आहे.
राज्यातील रेशन कार्ड माध्यमातून मोफत रेशन धान्य योजनेचा लाभ मिळवणाऱ्या लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाने रेशन आपल्या दारी हा एक महत्त्वाचा उपक्रम सुरू करण्याची तयारी दाखवली आहे. राज्यामध्ये शासन आपल्या दारी हा एक महत्त्वाचा अभियान राबवण्यात आलेला होता. या अभियानाला राज्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळालेला असून त्यानंतर आता नवीन अभियान जे की गरिबांना त्यांच्या घरापर्यंत मोफत ration dhanya उपलब्ध करून देईल.
त्यामुळे हे अभियान तसेच हा उपक्रम राज्यांमध्ये सुरू झाल्यानंतर तुम्हाला रेशन आणण्यासाठी रेशन धान्य दुकानात जाण्याची आवश्यकता नसून घरपोच ration dhanya धान्याचे वाटप शासनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलेली आहे.
शासनाच्या या नवीन धोरणानुसार तसेच योजनेनुसार ज्या नागरिकांना रेशन धान्याचे वाटप होत आहे, त्यांना स्वस्त धान्य दुकानांमध्ये जाण्याची आवश्यकता नसेल. फिरत्या शिधावाटप वाहनाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना धान्याची वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे जनतेचा वेळ तसेच पैसा सुद्धा वाचणार आहे. त्यामुळे ही Ration Home Delivery Scheme महत्वाची ठरणार आहे.
या ठिकाणाहून होईल योजनेची सुरुवात:
रेशन धान्य लाभार्थ्यांना घरपोच उपलब्ध करून देणाऱ्या योजनेचा शुभारंभ हा मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यामधून करण्यात येणार आहे. कोणताही राज्यातील गरीब नागरिक रेशन धान्य मिळण्यापासून वंचित राहू नये. यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे. त्याचप्रमाणे योजनेअंतर्गत लाभ मिळणाऱ्या लाभार्थ्यांना वेळेवर ration dhanya मिळणार आहे. येणाऱ्या पुढील काही महिन्यांमध्ये ही योजना सुरू करण्यात येत असून त्या बाबतची माहिती मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलेली आहे.
अशा प्रकारची एक नवीन व महत्त्वाची योजना राज्यामध्ये सुरू करण्यात येणार असून या संदर्भात एक छोटासा अपडेट आपण जाणून घेतलेला आहे.