Pocra Anudan: पोक्रा योजनेचं अनुदान आलं या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार रक्कम, 88.40 कोटी वाटपाचा शासन निर्णय आला

शेतकरी बांधवांना राज्यातील 5142 गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे. ज्या गावांमध्ये या योजनेचा समावेश आहे त्या गावाचा सर्व समावेशक विकास करण्यासाठी त्या गावांमध्ये विविध प्रकारच्या कृषी संदर्भातील योजना तसेच उपक्रम राबवण्यात येते तसेच अनुदान देण्यात येते. पोखरामध्ये विहिरी पासून ते अनेक प्रकारच्या मोठमोठ्या योजनांचा समावेश असून योजनेअंतर्गत या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते आणि अनुदानाच्या प्रतीक्षेत होते, अशा शेतकऱ्यांना Pocra Yojana अंतर्गत आता मोठा दिलासा मिळालेला आहे.

 

राज्य शासनाने 14 जून 2023 रोजी महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय प्रकाशित करून पोखरा योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना अनुदानाचे पैसे वाटप करण्यासाठी 88.40 कोटी रुपये वाटप करण्यासाठी मान्यता दिलेली आहे. त्यामुळे pocra yojana 2023 अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी अर्ज केलेला होता परंतु त्यांच्या बँक खात्यात अजूनही अनुदान आले नव्हते अशा शेतकऱ्यांना आता हे पैसे मिळतील.

 

तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग करण्याचे आदेश:

पोखरा योजना 2022 23 अंतर्गत अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने यापूर्वी 203 कोटी रुपयांच्या निधी वाटपासाठी मान्यता दिली होती. हा निधी वाटप करण्यासाठी राज्य शासनाने यापूर्वी शासन निर्णय देखील घेतला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ अनुदानाचे पैसे वर्ग करण्यात येणार आहे.

 

यांना मिळतो पोखरा योजनेचा लाभ:

पोखरा योजना ही राज्यातील एकूण 5142 गावांमध्ये सहा वर्षाकरिता राबवण्यात येत आहे. त्यामध्ये मराठवाड्यातील 4210 गावे असून विदर्भातील 932 गावे आहे. च्या गावांचा समावेश योजनेमध्ये आहे ज्या गावांची यादी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी एकूण चार हजार कोटी रुपये इतका खर्च करण्यात येणार आहे.

MSP 2023: ब्रेकिंग न्युज, खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ, शेतकऱ्यांना मोठा दिलासा, आता एवढा मिळेल पिकांना शासकीय दर

81 कोटी वितरणाचा शासन निर्णय जारी:

पोखरा योजनेच्या अंमलबजावणीसाठी तसेच pocra scheme 2023 अंतर्गत समाविष्ट असणार आहे लाभार्थ्यांना अनुदानाचे पैसे वितरित करण्यासाठी राज्य शासनाने 14 जून रोजी शासन निर्णय प्रकाशित करून 81 कोटी रुपये मंजूर केले आहे. त्याबाबतचा जीआर महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेला आहे.

 

पोखरा योजना 81 कोटी वितरणाचा शासन निर्णय येथे पहा

 

अशाप्रकारे पोखरा योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अपडेट आलेली होती, ती आपण या लेखात जाणून घेतलेली आहे. योजनेचा लाभ कसा मिळवायचा त्याकरिता अर्ज कसा करायचा आवश्यक कागदपत्रे कोणती लागतील या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण यापूर्वी जाणून घेतलेली आहे. या व्यतिरिक्त काही शंका असतील तर तुम्ही कमेंट करून प्रश्न विचारू शकतात.

Mansoon Update: मान्सून अपडेट, येत्या 48 तासात संपूर्ण महाराष्ट्र राज्यात पोहचणार मान्सून, हवामान खात्याचा अंदाज