MSP 2023: ब्रेकिंग न्युज, खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ, शेतकऱ्यांना मोठा दिलासा, आता एवढा मिळेल पिकांना शासकीय दर

केंद्र शासन दरवर्षी खरीप पिकांचे एमएसपी ठरवत असतो. यावर्षी देशातील केंद्रीय मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतलेला असून खरीप पिकांच्या एमएसपी मध्ये वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना कमीत कमी शासकीय दराने त्यांच्या पिकांची विक्री करून हा दर मिळवता येणार आहे. केंद्र सरकारने खरीप पिकांच्या msp मध्ये केलेल्या वाढीचा फायदा देशातील लाखो तसेच करोडो शेतकऱ्यांना होणार आहे.

 

एम एस पी म्हणजे काय? What is minimum support price?

शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांच्या दृष्टीने एमएसपी हा एक महत्त्वाचा शब्द आहे. शेतकरी दरवर्षी शेतामध्ये पिकांची लागवड करतो त्यानंतर ते पीक काढणीला आल्यानंतर ते बाजारात शेतकऱ्यांना विकावी लागते. परंतु अनेक वेळा बाहेरच्या मार्केटमध्ये शेतकऱ्यांना हवा तेवढा भाव मिळत नाही त्यामुळे एम एस पी म्हणजे कमीत कमी दरावर म्हणजेच हमीभावावर शेतकरी शासनाकडे तो माल विकू शकतात. म्हणजे त्यापेक्षा कमी दराने शेतमाल विकला जात नाही कारण की केंद्र शासनाने प्रत्येक पिकांचा एमएसपी ठरवून दिलेला असतो.

 

खरीप पिकांच्या हमीभावात वाढ Hamibhav 2023:

खरीप पिकांच्या 2023 करिता केंद्र शासनाने हमीभावात वाढ केलेली असून त्या संदर्भातील माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सात जून 2023 रोजी दिलेली आहे. खरीप पिकांच्या हमीभावात जास्तीत जास्त दहा टक्के इतकी वाढ डाळीच्या किमतीत करण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली हमीभाव संदर्भात बैठक पार पडलेली होती त्या msp 2023 बैठकीमध्ये या हमीभावामध्ये वाढ करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे.

Downloadgram

एम एस पी मध्ये किती झाली वाढ?

खालील पिकांच्या किमतीमध्ये खालील प्रमाणे वाढ झालेली आहे.

1. उडीद डाळ मध्ये 350 रुपयांची वाढ करण्यात आलेली असून आता उडीद डाळ या पिकाचा एम एस पी ६९५० रुपये प्रति क्विंटल इतका आहे.

2. तूर डाळ या पिकाच्या एमएसपी मध्ये चारशे रुपयांची प्रतिक्विंटल वाढ करण्यात आलेली असून आता तूर डाळ 7 हजार रुपये प्रति क्विंटल इतक्या दराने आहे.

3. मग या पिकाच्या एमएसपी मध्ये १०.४% ची वाढ करण्यात आलेली असून आता मुगाचा एम एस पी हा 8558 रुपये प्रति क्विंटल आहे.

4. कापूस या पिकाच्या एमएसपी मध्ये 9 टक्के वाढ करण्यात आलेली आहे.

5. भुईमूग या पिकाच्या एमएसपी मध्ये नऊ टक्के इतकी वाढ करण्यात आलेली आहे.

6. भात या पिकाच्या एमएसईमध्ये १४३ रुपयांची वाढ करण्यात आलेली असून भात पिकाचा एम एस पी हा २१८३ रुपये प्रति कोणत्या इतका आहे 2183 रुपये प्रति क्विंटल इतका आहे.

Mansoon Update: नवीन संकट, येत्या 24 तासात धडकणार चक्रीवादळ! आता मान्सून 10 दिवस लांबणार, ताजा हवामान अंदाज

अशाप्रकारे केंद्र शासनाने खरीप पिकांच्या msp मध्ये मोठी वाढ केलेली असून याचा फायदा अनेक शेतकऱ्यांना होणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांना कमीत कमी शासनाने वरील ठरवून दिलेला दर प्रत्येक पिकासाठी मिळणार आहे.

Nuksan Bharpai: शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, अतिवृष्टी नुकसानीसाठी अखेर 401 कोटी रु मंजूर, या शेतकऱ्यांना मिळेल पैसे