Mansoon Update: नवीन संकट, येत्या 24 तासात धडकणार चक्रीवादळ! आता मान्सून 10 दिवस लांबणार, ताजा हवामान अंदाजमित्रांनो राज्यात मान्सून लवकर येणार अशा अनेक चर्चा सुरू होत्या परंतु आता नवीन संकट येणार असून येत्या 24 तासांमध्ये चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ थेट मान्सून वर परिणाम करणार असून या चक्रीवादळामुळे मान्सून दहा दिवस लांबणीवर जाणार आहे. या चक्रीवादळाचा मोठा प्रभाव राज्यावर होणार असून एकंदरीत हे चक्रीवादळ कोणत्या भागात असणार जास्त करून कोणत्या भागांमध्ये प्रभावी असणार या Mansoon Update संदर्भात माहिती आपण जाणून घेणार आहोत.
गुजरात राज्यातील पोरबंदरच्या दक्षिणेला हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबत माहिती दिलेली असून अरबी समुद्राच्या आग्नेय भागात दबाव निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि हा दबाव चक्रीवादळामध्ये रूपांतरित होऊन वायव्येला सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे वायव्येच्या दिशेने हे cyclone तीव्र झाल्यास त्याचा परिणाम थेट मान्सूनवर होणार आहे.
हे आहे चक्रीवादळाचे मुख्य केंद्र:
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार गोव्याच्या पश्चिम नैऋत्य भागात जवळपास 920 किमी, आपल्या राज्याच्या मुंबईपासून 1120 किलोमीटर उदासीनता तयार झालेली आहे. हा या चक्रीवादळाचा मुख्य केंद्रबिंदू असून हे चक्रीवादळ सुरुवातीला गुजरातला धडकनार आहे. त्यानंतर या चक्रीवादळाचा परिणाम मान्सूनवर होणार आहे त्यामुळे राज्यात येणाऱ्या मानसून उशिरा पोहोचण्याची शक्यता आहे.
चक्रीवादळाचा थेट मान्सूनवर परिणाम होणार?
अरबी समुद्रामध्ये तयार होणारे चक्रीवादळ अधिक तीव्र झाल्यास त्याची तीव्रता केरळ किनारपट्टीच्या दिशेने गेल्यास मान्सूनच्या प्रगतीवर याचा परिणाम होणार आहे. राज्यात तसेच देशात केरळमधून मान्सूनचे आगमन होते त्यामुळे मानसून ची वाटचाल होत असतानाही चक्रीवादळ तीव्र स्वरूपात त्या दिशेने गेल्यास मानसून लेट होईल आणि परिणामी शेतकऱ्यांची पेरणी लेट होईल. अशी प्राथमिक माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.
मानसून केव्हा येणार? Mansoon 2023 Update:
देशात केरळ मधून mansoon चे आगमन होते तसेच केरळमध्ये हा मान्सून 8 जून किंवा 9 जून रोजी दाखल होण्याची शक्यता आहे. स्कायमेट या खाजगी हवामान कंपनीने केरळला सात जूनला मान्सून येतील असा अंदाज वर्तवला होता परंतु सध्याची परिस्थिती लक्षात घेता तीन दिवस हा मान्सून लेट होऊ शकतो. दरवर्षी नैऋत्य मोसमी मान्सून हा साधारणपणे एक जूनच्या जवळपास म्हणजे त्यामध्ये सात दिवस कमी किंवा सात दिवस जास्त या अंतराने येत असतो. त्यामुळे आठ ते नऊ जून ह्या तारीख सुद्धा मान्सूनच्या आगमनाची असली तरीसुद्धा चक्रीवादळाचा परिणाम झाल्यास तो आणखीन लांबण्याची शक्यता सुद्धा आहे.