शेतकरी बांधवांना महाराष्ट्र राज्याच्या तसेच केंद्र शासनाच्या सर्व योजना महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर एकत्रित पद्धतीने एकाच पोर्टलवर राबविण्यात येत आहेत. योजनेअंतर्गत संबंधी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांची निवड ही लॉटरी पद्धतीने करण्यात येते. योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी अर्ज केले होते अशा सर्व शेतकऱ्यांची विविध योजनांसाठी लॉटरी निघालेली असून लॉटरीमध्ये नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना या Mahadbt Farmers Lottery अंतर्गत लाभ मिळणार आहे.
लॉटरीचा एसएमएस तुम्हाला आला का? Mahadbt Farmers scheme:
शेतकरी मित्रांनो महाडीबीटी शेतकरी योजनांची ऑनलाईन सोडत निघालेली असून शेतकऱ्यांना ऑनलाइन सोडती मध्ये नाव आल्याचा एसएमएस प्राप्त होत आहे. त्यामुळे जर तुम्हाला एसएमएस आलेला नसेल तर तुम्ही लॉगिन करून shetkari yojana lottery लागली का ते चेक करू शकतात.
खालील योजनांची लॉटरी लागली:
महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर राबविण्यात येणार आहे कृषी यांत्रिकीकरण योजना तसेच फलोत्पादन योजना, सिंचन साधने व सुविधा, बी खाते व औषधी योजना, तसेच विशेष सहाय्य योजनांची लॉटरी लागली आहे.
ऑनलाइन सोडती मध्ये निवड झाल्याचे एसएमएस शेतकऱ्यांना प्राप्त होत आहे.
योजनांसाठी तुमची निवड झाली का असे चेक करा Mahadbt Lottery List PDF:
जर शेतकरी बांधवांना तुम्हाला ऑनलाईन सोडती मध्ये नाव आल्याचा एसएमएस प्राप्त झालेल्या नसेल तर तुम्ही खालील पद्धतीने ऑनलाईन लॉटरीमध्ये निवड झाली का चेक करू शकतात.
1. सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईल मध्ये महाराष्ट्र शासनाची महाडीबीटी शेतकरी योजनांची अधिकृत वेबसाईट ओपन करा.
2. जर ही वेबसाईट तुम्हाला माहित नसेल तर गुगलमध्ये महाडीबीटी फार्मर हा शब्द टाकून सर्च करा.
3. आता तुमच्यासमोर जी महाडीबीटी योजना ची वेबसाईट आलेली आहे ती ओपन करा त्यामध्ये लॉगिन करा.
4. आता तुम्हाला या वेबसाईटचा डॅशबोर्ड मध्ये मी अर्ज केलेल्या बाबी तसेच छाननी अंतर्गत अर्ज आणि अशा अनेक पर्याय दिसतील, हो तुम्ही अर्ज केलेल्या सर्व योजना दिसतील त्यापैकी ज्या योजनेसमोर विनर नाव आहे त्या योजनेची लॉटरी तुम्हाला लागलेली आहे.
Jamin Vatani Patra: 100 रुपयात करा शेत जमिनीची वाटणी, विशेष मोहीम सुरू, असा करा अर्ज
सोडतीत नाव असेल तर हे काम करा:
तुमचे कृषी योजनांच्या ऑनलाईन सोडती मध्ये नाव आलेली असेल तर तुम्हाला सात दिवसाच्या आत ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे अपलोड करायचे आहे. महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी शेतकरी योजनांच्या वेबसाईटवर लॉगिन करून योजने संदर्भातील सर्व कागदपत्रे अपलोड करा. जर तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर किंवा इतर योजनांची अवजारांची यादी लागली असेल तर त्या संदर्भात प्रकल्प अहवाल तसेच टेस्ट रिपोर्ट आणि कोटेशन व सातबाराआणि आधार कार्ड अपलोड करा.