Gharkul Yojana: राज्यात 1 लाख 7 हजार नवीन घरकुलांना मंजुरी, आता प्रत्येकाला घरकुल, शासन निर्णय जाहीर लगेच पहा

महाराष्ट्र शासनाच्या मार्फत तसेच केंद्र शासनाच्या मार्फत राज्यात प्रत्येकाला घरकुल मिळावे यासाठी अनेक घरकुल योजना राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या या घरकुल योजना अंतर्गत आता राज्यात नवीन 1 लाख 7 हजार घरकुलांचे वाटप होणार आहे. महाराष्ट्र शासनाने या घरकुलांना मंजुरी दिलेली असून कोणत्या जिल्ह्यातील किती लाभार्थ्यांना हे घरकुल मिळणार या Gharkul Yojana ची माहिती आता आपण जाणून घेणार आहोत.

 

 

1 लाख 7 हजार घरकुल मंजुरीचा शासन निर्णय जाहीर:

मित्रांनो महाराष्ट्र राज्यात वाटप करण्यात येणारे ही एक लाख सात हजार घरकुल लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मंजुरी देण्याचा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय 2 जून 2023 रोजी जाहीर केलेला आहे. म्हणजेच हे Gharkul वाटप करण्यासाठी मान्यता मिळालेली असून नेमकं कोणत्या लाभार्थ्यांना हे घरकुल मिळणार याची माहिती जाणून घेऊया.

 

हे घरकुल कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार? Gharkul Yojana 2023:

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील आदिवासी समाजातील जे बांधव कोडा मातीच्या घरात राहतात म्हणजेच त्यांच्याकडे स्वतःची पक्के घर नाही अशा अनुसूचित जमातीच्या लोकांना हे घरकुल वाटप होणार आहे.

 

कोणत्या योजनेअंतर्गत घरकुल मिळणार?

महाराष्ट्र राज्य पुरस्कृत शबरी आवास योजनेअंतर्गत हे घरकुल लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत केवळ अनुसूचित जमातीच्या स्वतःचे पक्के घर नसणाऱ्या लाभार्थ्यांना घर मिळतील.

ज्या कुटुंबाचं एकूण वार्षिक उत्पन्न हे एक लाख वीस हजार रुपयांच्या आत आहे असे कुटुंब लाभ मिळण्यासाठी पात्र आहे.

 

कोणत्या जिल्ह्याला किती घरकुलाची वाटप होणार? Gharkhul List:

योजनेअंतर्गत कोणत्या जिल्ह्याला किती घरकुल मिळणार आहे याची माहिती खालील प्रमाणे.

1. नाशिक जिल्हा- 8000 घरकुल

2. अहमदनगर- 2000

3. ठाणे – 2000

4. पालघर – 4222

5. रायगड 2639

6. सिंधुदुर्ग 0

7. रत्नागिरी 2

8. पुणे १८६४

9. सातारा 10

10. सांगली 0

11. सोलापूर 100

12. धाराशिव 125

13. जळगाव 5000

14. नंदुरबार 24000

15. धुळे 5709

16. नांदेड 3000

17. हिंगोली 5000

18. परभणी 1000

19. अमरावती 7906

20. अकोला 600

21. बुलढाणा 1500

22. वाशिम 700

23. यवतमाळ 4500

24. छत्रपती संभाजी नगर 3936

25. जालना 1794

26. लातूर 636

27. बीड 1179

28. नागपूर 5000

29. वर्धा 500

30. गोंदिया 1500

31. भंडारा 1226

32. चंद्रपूर 8666

33. गडचिरोली २७७५

Gharkul Yojana FTO Check: या लाभार्थ्यांच्या खात्यात घरकुल योजनेचे पैसे जमा, तुम्हाला मिळाले का? लगेच चेक करा

अशाप्रकारे एकूण राज्याला या योजनेअंतर्गत एक लाख सात हजार नव्यांनव नवीन घरकुलाचे वाटप होणार आहे. त्यामुळे राज्यातील जे आदिवासी बांधव कच्च्या घरामध्ये राहतात अशा सर्व कुटुंबांना आता स्वतःचे हक्काचे व पक्के घर मिळणार आहे.

 

आता प्रत्येकाला घरकुल:

जर एखाद्या जिल्ह्यामध्ये घरकुलाचा उद्दिष्ट जास्त असेल परंतु अर्ज कमी आलेले असेल आणि एखाद्या जिल्ह्यामध्ये आपल्या उद्दिष्ट कमी असेल आणि अर्ज जास्त असेल तर ज्या जिल्ह्यात घरकुल शिल्लक राहतील त्या जिल्ह्याचा कोटा इतर जिल्ह्यांना

Gharkul Yojana FTO Check: या लाभार्थ्यांच्या खात्यात घरकुल योजनेचे पैसे जमा, तुम्हाला मिळाले का? लगेच चेक करा

उपलब्ध होणार आहे त्यामुळे सर्वांना आता घरकुल मिळणे शक्य होणार आहे.