बायोगॅस अनुदान योजना अर्ज सुरू, आता मिळवा 72 हजार रुपये पर्यंत अनुदान, असा करा अर्ज | Biogas Anudan Yojana

मित्रांनो बायोगॅस अनुदान योजना अंतर्गत राज्यातील पशुपालकांना तसेच शेतकऱ्यांना बायोगॅस यंत्राच्या उभारणीसाठी अनुदान देण्यात येत असते. या योजनेअंतर्गत अनुदान मिळण्यासाठी सध्या अर्ज सुरू झालेले असून योजनेअंतर्गत अर्ज कसा करायचा मिळणारे अनुदान तसेच या Biogas Anudan संदर्भात संपूर्ण माहिती आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

 

 

किती लोकांना मिळणार बायोगॅस?

मित्रांनो बायोगॅस अनुदान योजना अंतर्गत सन 2023 करिता महाराष्ट्र राज्यात 5200 बायोगॅस उभारणीचा लक्षण का उपलब्ध झालेला असून म्हणून राज्यातील पाच हजार दोनशे लाभार्थ्यांना बायोगॅस उभारणी करिता अनुदान मिळणार आहे.

त्यामुळे आता या Biogas Anudan Yojana अंतर्गत ऑनलाइन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

 

शेतकऱ्यांसाठी बायोगॅस का महत्त्वाचे?

शेतकऱ्यांना स्वच्छ इंधन मिळावे तसेच तसेच इंधनावरील अनावश्यक खर्च कमी व्हावा, शेतकऱ्यांना याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय किंवा जोडधंदा उपलब्ध व्हावा, तसेच या बायोगॅसच्या माध्यमातून जी स्लरीं निघते ती शेतकऱ्यांना खत म्हणून वापरता येते जी शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर असते.

 

अनुदान किती मिळते? Biogas Anudan Yojana?

बायोगॅस अनुदान योजनेअंतर्गत घनमीटर च्या प्रमाणे अनुदान मिळते म्हणजेच बायोगॅसच्या प्रमाणानुसार तुम्हाला अनुदान मिळते. त्यामध्ये 1 घनमीटर च्या बायोगॅसच्या उभारणीसाठी साधारणपणे सर्वसाधारण प्रवर्गाला नऊ हजार आठशे रुपये तर अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गाला 17 हजार रुपये पर्यंतचा अनुदान दिले जाते. त्याचप्रमाणे वीस ते पंचवीस घनमीटर च्या बायोगॅस यंत्रासाठी अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना 72 हजार रुपये अनुदान दिले जाते. जर या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी अतिरिक्त अनुदान मिळवण्यासाठी शौचालय जोडले तर त्याला सोळाशे रुपये अतिरिक्त अनुदान मिळते.

 

बायोगॅस योजना आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती येथे पहा

 

 

अर्ज कसा करायचा? How to Apply For Biogas Anudan Yojana?

या योजनेअंतर्गत आपल्याला ऑफलाइन तसेच ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येते. त्यानंतर काय ऑफलाइन अर्ज करायचा असेल तर तुम्ही ग्रामसेवकाला भेटून या संदर्भात अर्ज करू शकतात. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत योजनेचे अंमलबजावणी करण्यात येत असून ऑफलाइन देखील अर्ज स्वीकारण्यात येत आहेत.

 

ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्ही राष्ट्रीय बायोगॅस मिशन अभियानाच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करू शकतात.

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

बायोगॅस अनुदान योजना संपूर्ण माहिती येथे पहा

 

जर तुम्हाला बायोगॅस अनुदान योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर वरील लिंक वरून तुम्ही राष्ट्रीय बायोगॅस मिशन योजनेचे अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करू शकतात. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यात येईल त्यानंतर काही ऑफलाइन प्रक्रिया असेल तर तीपूर्ण करून योजनेचा लाभ मिळवून देण्यात येईल.