शेतकरी बांधवांना जून महिना सुरू झाल्यापासून प्रत्येक दिवशी आपण मान्सून आज येईल किंवा उद्या येईल किंवा आठ दिवसांनी येईल, या आठवड्यामध्ये मान्सून येईल, येत्या पाच दिवसांमध्ये मान्सूनचे आगमन होईल असे अनेक प्रकारचे बातम्या आलेल्या आहेत. परंतु चक्रीवादळामुळे हवामान विभागाने दिलेला अंदाज सुद्धा फेल ठरलेला आहे. त्यामुळे आता शेतकरी बांधवांसमोर एक नवीन संकट आलेला असून मान्सून पुन्हा लांबण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या संदर्भात Mansoon Andaj सविस्तर जाणून घेणार आहोत.
मान्सून लांबण्याची शक्यता:
तुमचा पहिला आठवडा संपलेला असून अजून देखील राज्यामध्ये सर्वत्र मान्सूनचे आगमन झालेलं नाही. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या कोकण भागात 11 जूनला मान्सून पोहोचला होता परंतु सध्या मान्सूनचा प्रवास थांबलेला आहे, आणि हा mansoon.चा प्रवास आणखीन काही दिवस लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबतची अधिकृत माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून 15 जून रोजी वर्तवण्यात आलेला आहे.
दरवर्षी या तारखेला येत असतो मान्सून:
दरवर्षी राज्यामध्ये मान्सून एक जून रोजी दाखल होत असतो. किंवा एक जूनच्या आसपास तो दाखवत असतो. परंतु हा mansoon राज्याच्या कोकण भागात यावर्षी उशिरा दाखल झालेला असून तो 11 जून रोजी राज्यांमध्ये कोकण भागात पोहचला होता. परंतु राज्यांमध्ये मान्सून दाखल होऊन चार ते पाच दिवस झालेले असून सुद्धा अजून पर्यंत पावसाने हजेरी लावलेली नाही.
या तारखेपासून मान्सून होणार सर्वत्र दाखल:
भारतीय हवामानशास्त्र विभागाने नुकत्याच दिलेल्या नवीन माहितीनुसार 23 जून 2023 पासून महाराष्ट्रासह अनेक भागात मान्सून जोर धरणार आहे. मानसून संख्या राज्याच्या कोकण भागात असला तरी सुद्धा निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे मानसून मधील आद्रता शोषून घेण्यात आलेली आहे. त्यामुळे सध्या मान्सून जोर धरणार नसून त्याचा प्रवास लांबून 23 जून नंतर तो तीव्रतेने पुढे सरकणार आहे. हा hawaman andaj सर्व शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावा.
याबाबतची अधिकृत माहिती हवामान शास्त्रज्ञांनी दिलेली आहे. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी धूळपेरणी शक्यतो करू नये, करणी करण्यासाठी आवश्यक असणारे पावसाचे प्रमाण जमिनीमध्ये निर्माण झाल्यानंतर नंतरच पेरणी करावी.