Bogas Cotton Seeds: शेतकऱ्यांनो सावधान, कपाशीची बनावट बियाण्याची पाकिटे जप्त, या जातीची बनावट बियाणे विक्री सुरू, वेळीच सावध व्हा

शेतकरी मित्रांनो मान्सूनच्या आगमन राज्यांमध्ये झालेल्या असून आता पेरणीच्या कामांना सुरुवात होणार आहे, त्यामुळे शेतकरी कृषी केंद्र मध्ये बियाणे खरेदी करण्यासाठी धाव घेत आहेत. परंतु शेतकरी मित्रांनो बियाण्यांची खरेदी करताना तुम्हाला काही आवश्यक योग्य काळजी घ्यायची आहे. दरवर्षी बियाणे ची खरेदी करत असताना अनेक जातीच्या बियाण्यांची डुप्लिकेट म्हणजेच Bogas Cotton Seeds बनावट पाकीट आपल्याला पाहायला मिळते.

 

अनेक नामांकित कंपन्यांना मागणी असल्यामुळे समाजातील काही घटकाद्वारे बनावट बियाण्यांची विक्री केल्या जाते त्यामुळे अशा बनावट बियाणांची शेतकऱ्यांनी खरेदी केल्यास त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना भोगाव लागू शकतो.

 

कपाशीची 955 बनावट पाकीट जप्त:

परभणी जिल्ह्यामध्ये ही कपाशीची बनावट पाकीट सापडलेली असून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या पथकाने मानवत येथे विक्रीसाठी आणलेल्या एका खाजगी कंपनीच्या कपाशीच्या वाणाची पाकिटे जप्त केलेली आहे. त्या Bogas Cotton Seeds संदर्भातील तक्रार पंचायत समिती मधील बियाणे निरीक्षकांनी दिलेली होती. त्यामुळे चार व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

 

जप्त करण्यात आलेली कपाशीची 955 पाकिटे असून तशीच लिमिटेड या कंपनीच्या कबड्डी आणि 144 तुळशी बीजी टू यांचा समावेश होता. बियाणे या ठिकाणी विक्रीसाठी येणार आहे अशी गोपनीय माहिती संबंधित विभागाला मिळाल्यानंतर वाहनांची तपासणी केल्यानंतर संशयित बनावट पाकिटे सापडली होती.

 

या बनावट कपाशीच्या पाकिटांमध्ये बियाण्यांची ओळख करून घेण्यासाठी सॅम्पल प्रयोग शाळेमध्ये पाठवण्यात आलेले होते नंतर ते बनावट असल्याचे सिद्ध झाले.

 

शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना खालील काळजी घ्यावी:

1. Cotton Seeds बियाण्यांची खरेदी करत असताना प्रत्येक बियाण्याच्या पाकिटावर लेबल क्रमांक आहे का ते चेक करा.

2. बियाण्याच्या प्रत्येक पाकिटाला वेगवेगळ्या लेबल क्रमांक असतो त्यामुळे ते सुद्धा चेक करा.

3. कृषी केंद्र धारकांकडून बियाणे खरेदी केल्याचे पक्के बिल घ्या.

4. घेण्याच्या पाकिटांवरील लॉट नंबर चेक करा.

5. सरकार मान्य कृषी सेवा केंद्र धारकांकडून च बियाण्यांची खरेदी करा.

 

अशाप्रकारे शेतकरी बांधवांना बियाण्यांची खरेदी करताना योग्य काळजी घेण्याची आवश्यकता असून शेतकऱ्यांसाठी नवीन हंगाम सुरू असताना पेरणी व त्याकरिता लागणारी बियाणे ही अत्यंत महत्त्वाची असतात त्यामुळे योग्य ती काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कारण की एक वेळ पेरणी केल्यानंतर संपूर्ण वर्षभर त्याच उत्पन्नातून शेतकऱ्यांना दिवस काढावे लागतात.

Cotton Lagvad: शेतकरी मित्रांनो कापसाची लागवड करताय! या बॅगेची करा निवड, 25 ते 30 क्विंटल एकरी उत्पादन होणार

या व्यतिरिक्त बियाणे खरेदी करताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी कोणत्या गोष्टी चेक करावे या संदर्भात विस्तृत माहिती आपण यापूर्वीच्या पोस्टमध्ये जाणून घेतलेली आहे.

शेतकरी मित्रांनो यावर्षी सोयाबीनच्या या वाणाची पेरणी करा, एकरी 15 ते 20 क्विंटल उत्पादन होईल | Soyabean Perani