Cotton Lagvad: शेतकरी मित्रांनो कापसाची लागवड करताय! या बॅगेची करा निवड, 25 ते 30 क्विंटल एकरी उत्पादन होणार

शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांचं जीवन हे संपूर्ण शेतीवर अवलंबून असतो, शेतकऱ्यांसाठी पेरणी आणि लागवडीचा काळ हा अत्यंत महत्त्वाचा असतो कारण की एक वेळ लागवड किंवा पेरणी झाल्यानंतर त्याला जवळपास सहा महिने ते एक वर्षापर्यंत देखभाल करावी लागते त्याच्यापासून चांगल्या प्रकारचे उत्पन्न मिळवण्यासाठी त्या पिकावर योग्य ती काळजी घ्यावी लागते. परंतु शेतीतून उत्पन्न मिळण्यासाठी सर्वात पहिली आणि महत्त्वाची क्रिया म्हणजे योग्य त्या जातीच्या पिकांची लागवड करणे. जर तुम्ही कापूस हे पीक पीक होणार असाल तर योग्य त्या Cotton Lagvad जातीची कापसाची बॅग निवडून त्याची लागवड करणे.

 

बाजारामध्ये कापसाच्या जातीचे अनेक कंपन्या आहेत, त्यापैकी आपण आजच्या या लेखात तुळशी कंपनीच्या कबड्डी या वाणाची माहिती जाणून घेणार आहोत. या वानाची लागवड ही चार बाय दीड किंवा तीन बाय एक किंवा चार बाय एक या पद्धतीने करता येते. तुम्ही तुमच्या जमिनीच्या हलक्या भारी स्वरूपानुसार लागवडीची पद्धत म्हणजेच अंतर चेंज करू शकतात. या kabbadi जातीच्या वाणाचा कालावधी हा 160 दिवस ते 165 दिवस इतका आहे.

 

या जातीच्या एका बोंडाचे वजन सहा ते सात ग्रॅम इतके भरते. हे वान खास करून आंध्र प्रदेश तसेच तेलंगणा व मध्य प्रदेश तसेच गुजरात आणि महाराष्ट्र यामध्ये लागवड काढले जाते. गेल्या दोन वर्षापासून या जातीच्या वाणाची मागणी महाराष्ट्रात देखील वाढत आहे.

 

कापसाच्या कबड्डी जातीचे वैशिष्ट्ये:

या कबड्डी वाणाची लागवड आपण हलक्या जमिनी तसेच हलक्या व मध्यम आणि भारी जमिनी देखील करू शकतो. या वनावर कीड रोगाचा जास्त प्रादुर्भाव होत नाही. म्हणजेच इतर वाहनाच्या तुलनेत या मानावर कमी प्रमाणात रोगराई तुम्हाला दिसून पडेल. जर तुमची जमीन चांगली असेल तर तुम्ही ज्या वाणाच्या माध्यमातून एकरी 15 ते 20 क्विंटल पर्यंत कापूस काढू शकतात. असा कंपनी दावा करते परंतु ते आपल्या जमिनीवर तसेच आपण ज्या पद्धतीने लागवड केल्यानंतर पिकाची सोय घेतो त्या cotton मध्ये पाण्याची नियोजन करतो खतांची व्यवस्थापन करतो यानुसार देखील अनेक बाबी ठरतात.

 

कापसाचे kabbadi हे वाहन वेचणीसाठी सोपे आहे, तसेच तोंडाचा आकार मोठा असल्यामुळे देखील इतर झाडांची तर या झाडाची तीस बोटे असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी आजकाल या वानाकडे वळत आहे.

 

शेतकरी बांधवांना कापूस असे पीक आहे ज्याला जवळपास एक वर्षापर्यंत आपल्याला सांभाळावे लागते इतर पिकांच्या तुलनेत कापसाला जास्तीत जास्त खर्च येतो कापसाला दोन ते तीन किंवा चार सुद्धा खत द्यावे लागतात. कापूस या पिकावर कमीत कमी चार फवारण्या करावे लागतात. तसेच कापसाला खुरपणी तसेच वेचणीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो त्यामुळे जर शेतकऱ्यांना कापसापासून नफा कमवायचा असेल तर वाणाची निवड महत्त्वाची ठरते.

 

नुसतेच वाणाची निवड करून होत नाही तर शेतकऱ्यांनी योग्य त्या पद्धतीने सुरुवातीपासून कापसाची व्यवस्थापन करावे लागते.

Hawaman Andaj: आजपासून राज्याच्या या भागात होणार जोरदार पाऊस, तुमच्या जिल्ह्यात पाऊस होणार का? अचूक हवामान अंदाज

टीप: आम्ही कोणत्याही शेतकरी बांधवांना वरील पिकांची लागवड करण्याचा किंवा वरील वाणांची लागवड करण्याचा सल्ला देत नाही. शेतकऱ्यांनी स्वतः सर्व बाबींची चौकशी करून योग्य तो निर्णय घ्यावा. शक्यतो आपल्या अनुभवानुसार चांगल्या वाटणाऱ्या वाणाची निवड करावी.

MSP 2023: ब्रेकिंग न्युज, खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ, शेतकऱ्यांना मोठा दिलासा, आता एवढा मिळेल पिकांना शासकीय दर