Hawaman Andaj: आजपासून राज्याच्या या भागात होणार जोरदार पाऊस, तुमच्या जिल्ह्यात पाऊस होणार का? अचूक हवामान अंदाज

शेतकरी बांधवांना राज्याच्या काही भागात पावसाला सुरुवात झालेली असून अनेक शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. हवामान विभागाने राज्यात पाऊस पडण्या संदर्भात नवीन अंदाज जाहीर केलेला असून आजपासून राज्याच्या अनेक भागात पावसाला सुरुवात होणार आहे. नेमकं कोणत्या भागात पावसाला सुरुवात होईल किती प्रमाणात पाऊस पडेल या Hawaman Andaj संदर्भातील हवामान विभागाने जाहीर केलेला अंदाज आपण जाणून घेणार आहोत.

 

भारतीय हवामान विभागाने 8 जून 2023 रोजी मान्सून दाखल होईल असा अंदाज वर्तवला होता परंतु अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ निर्माण झालेले होते त्यामुळे मान्सून केरळमध्ये दाखल होण्यासाठी दोन दिवसांचा वेळ लागला. केरळमध्ये mansoon आलेला असून तो आता राज्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. पुढील काही दिवसात महाराष्ट्रात माणसांचे आगमन होणार असून त्यापूर्वी पुढील चार दिवस राज्याच्या विविध भागात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

 

शेतकरी बांधवांनो हवामान विभागाच्या अंदाजानुसार अचूक वेळेमध्ये मान्सून येणार होता परंतु चक्रीवादळामुळे mansoon येण्यासाठी वेळ लागला. यावर्षी सरासरी एवढा पाऊस राहण्याचा अंदाज हवामान विभागाने भरलेला असून दरवर्षीप्रमाणे यंदाही पाऊस पडेल असा अंदाज काही खाजगी हवामान अभ्यासकांनी वर्तवलेला आहे.

 

आज पासून या ठिकाणी पडेल पाऊस:

अरबी समुद्रात तयार झालेले हे चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्याकडे सरकलेले असून याचा परिणाम राज्याच्या Hawaman वर होत आहे. हवामानात मोठ्या प्रमाणात बदल झालेला असून राज्यात दिनांक 10 जून ते 14 जून या कालावधीपर्यंत विविध भागात पाऊस पडणार आहे. हा पाऊस भाग बदलत पडणारा असून त्यानंतर विश्रांती घेऊन पुन्हा १८ जून ते 22 जून दरम्यान देखील पावसाचे वातावरण असणार आहे.

 

चक्रीवादळामुळे मान्सून ला विलंब:

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम राज्याच्या तसेच देशाच्या मान्सून वर झालेला असून मोठ्या प्रमाणात हवामानामध्ये बदल झालेला आहे. मान्सूनच्या गतीवर या चक्रीवादळाने परिणाम केला, त्यामुळे मान्सून लांबलेला आहे. मानसून सध्या केरळमध्ये दाखल झालेला असून पुढील काही दिवसात तो महाराष्ट्रात येणार आहे.

Nuksan Bharpai: शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, अतिवृष्टी नुकसानीसाठी अखेर 401 कोटी रु मंजूर, या शेतकऱ्यांना मिळेल पैसे

त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये पेरणीला सुरुवात होणार असून शेतकरी बांधवांनी आवश्यक तो पाऊस झाल्याशिवाय पेरणी करण्याची घाई करू नये.

 

Gharkul Yojana: राज्यात 1 लाख 7 हजार नवीन घरकुलांना मंजुरी, आता प्रत्येकाला घरकुल, शासन निर्णय जाहीर लगेच पहा