Monsoon 2023: मान्सूनला उशीर झाल्यामुळे या क्षेत्रावर होणार गंभीर परिणाम, अर्थव्यवस्था, महागाई सर्वांवर गंभीर परिणाम

शेतकऱ्यांच्या दृष्टीने नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मान्सून हा अतिशय महत्त्वाचा असतोच. मानसून आला तरच शेतकरी पेरणी करू शकतात. शेतकऱ्यांनी मान्सूनच्या भरोशावर पेरणी केली तरच चांगले पीक येईल. त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडे पैसा येईल आणि इतर लोकांना अन्नधान्य मिळेल. व सर्व गोष्टी सुरळीत चालतील. एवढेच नाही तर मान्सून हा अनेक बाबींवर परिणाम करतो त्यामध्ये अर्थव्यवस्थेवर परिणाम तसेच महागाईवर परिणाम त्याचबरोबर इतर घटकावर Monsoon थेट परिणाम करतो.

 

परंतु सध्या mansoon 2023 लेट झालेला असून त्याचा परिणाम विविध घटकांवर होताना दिसत आहे, तसेच होत आहे. यावर्षी नैऋत्य पाऊस मान्सून हा खूप जास्त दिवस उशिरा येत असून तो यावर्षी सामान्य असण्याचा अंदाज आहे.

 

सिंचनासाठी मान्सून अतिशय महत्त्वाचा:

शेतकऱ्यांना सिंचन करण्यासाठी तसेच नवीन हंगामामध्ये प्रामुख्याने विविध शेती पिकांचे उत्पादन घेण्यासाठी मान्सून अतिशय महत्त्वाचा असतो. यावर्षी मानसून म्हणजेच पाऊस हा सरासरी एवढा होणार असून त्याचे प्रमाण सामान्य असण्याची शक्यता आहे. आपल्या देशातील जास्तीत जास्त शेतकरी मान्सून वर आधारित शेती करतात म्हणजेच अशा शेतकऱ्यां कडे त्यांच्या सुविधा उपलब्ध नसून नैऋत्य मोसमी पावसावरच ते शेती करतात. त्यामुळे mansoon च्या या अवेळी पावसामुळे तसेच पावसाच्या कमी शक्यता मुळे सिंचनाखाली क्षेत्र कमी येणार आहे.

 

महागाईत वाढ होण्याची शक्यता:

यावर्षी खरीप हंगामातील पेरण्या उशिरा होणार आहे, जर त्याचा परिणाम उत्पन्नावर झाला तर खाद्यपदार्थाच्या किमती वाढू शकतात. तसेच एल निनो च्या धोक्यामुळे अनेक भागात दुष्काळ देखील पडण्याचा अंदाज आहे परंतु अनेक हवामान अभ्यासकांनी दुष्काळ पडणार नाही असे भाकित केले आहे.

परंतु या दरम्यान महागाईवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. याबाबत रिझर्व बँकेने सुद्धा भीती व्यक्त केली आहे.

khatache bhav: रासायनिक खतांचे 2023 चे भाव पहा ऑनलाईन, जाणून घ्या कोणत्या खताचा किती दर आहे, यापेक्षा जास्त किमतीत खते खरेदी करू नका

ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर परिणाम:

Mansoon चा संबंध जास्तीत जास्त ग्रामीण भागात येतो. शेतकरी ग्रामीण भागामध्ये राहतात, ग्रामीण भागातील जास्तीत जास्त लोक शेती करतात आणि ती शेती मान्सून वर आधारित असते. त्यामुळे निवृत्ती मोसमी पाऊस उशिरा येत असल्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कोलमडली आहे. ग्रामीण भागामध्ये येणारा जास्तीत जास्त पैसा शेतीमधून येतो परंतु पाऊस नसला तर उत्पन्न देखील होणार नाही त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे.

Mansoon Andaj: शेतकऱ्यांसमोर नवीन संकट, मान्सून पुन्हा लांबणीवर! IMD ने मान्सून बाबत केला नवीन अंदाज